महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis on INDIA : ममता बॅनर्जी बैठकीतून रागानं गेल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा, म्हणाले... - देवेंद्र फडणवीस ममता बॅनर्जी

Devendra Fadnavis on INDIA मुंबईत दोन दिवस इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीवरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. २८ पक्षांची एकी दिसण्यापेक्षा त्यांच्यामध्ये मतभेदचं मोठ्या प्रमाणात असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईतील महायुतीच्या सभेत ते बोलत होते.

Devendra Fadnavis on INDIA
Devendra Fadnavis on INDIA

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 10:34 PM IST

मुंबईDevendra Fadnavis on INDIA :उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित दादा यांचे भाषण चालू असताना मी काही वेळासाठी बाहेर गेलो होतो. याचं कारण नेव्हीचे चीफ महाराष्ट्रात आले होते. त्यांची मला भेट घ्यायची होती. अन्यथा अजित यांचे भाषण सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर निघून गेले, अशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जातील. भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष म्हणजे फेव्हीकॉल का मजबूत जोड है. और यह टूटने वाला नही है. आमच्यामध्ये पूर्ण संवाद व शंभर टक्के समन्वय आहे. इंडिया आघाडीसाठी परिस्थिती आमच्यमध्ये अजिबात नाही. कोणाची जागा कुठे आहे, हे सर्वांना माहीत आहे. Devendra Fadnavis on Mamata Banerjee

ममता बॅनर्जींना खुर्ची दिली नाही -इंडिया आघाडीची भिंडी आघाडी झाली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी आल्या सर्वांना नमस्कार करत पुढे गेल्या. परंतु एकाही नेत्याने त्यांना बसायला खुर्ची दिली नाही. रागावून त्या निघून गेल्या असल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शरद पवारांनी ममता यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, असा प्रयत्न त्यांनी अजित दादा यांना थांबवण्याचा केला होता. परंतु अजित दादा थांबले नाहीत. आमच्या महायुतीत अतिशय सुस्पष्टता आहे. कोणाची खुर्ची कुठे आहे, हे सर्वांना माहीत आहे. ही इंडी आघाडी अजून त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार देऊ शकली नाही. लोगो येणार लोगो येणार म्हणून नाचत राहिले. परंतु यांचा लोगोसुद्धा आला नाही. कारण ३६ पक्षाचे ३६ झेंडे आहेत. त्यातील कुठला रंग द्यायचा आहे त्यांना समजत नाही.

कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे, हा वाक्यप्रचार याचा अर्थ काय असतो हे आता समजलं आहे. कोविड काळात ६०० रुपयाची बॉडीबॅग ६ हजार रुपयाला विकत घेतली. परंतु आता हे सर्व बाहेर येणार आहे. मी, अजित पवार व मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे, अभी छोडेंगे नही-देवेंद्र फडणवीस


प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे-पुढे फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच आश्चर्य वाटत नाही. निवडणुका आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला जात आहे, हे त्यांनी ठरवूनच ठेवलं आहे. कोणाच्या बापात हिंमत नाही, असं होणार नाही हे त्यांनाही माहित आहे. सध्या काही कॅमेराजीवी लोक अजित पवार यांच्याकडून तिकडे गेली आहेत. ते दररोज उठून काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात. त्यांना मुंबईचा विकास होऊ द्यायचा नाही. मुंबईतील माणसाला भयभीत करायचं काम ते करत आहेत. परंतु मुंबईची, महाराष्ट्राची घोडदौड आता कोणीच थांबू शकत नाही. जे मुंबईच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येत आहेत, ते महाराष्ट्र द्रोही लोक आहेत.


शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही-आमचं सरकार आल्यानंतर मुंबई व महाराष्ट्रासाठी ताकदीनं निर्णय घेतले आहेत. ८० हजार कोटी मुंबई महानगरपालिकेच्या खात्यात पडून आहेत. परंतु आजही डांबरी रस्ते नव्हते. यंदा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या ३ वर्षात सर्व रस्ते काँक्रिटचे होणार आहेत. डांबर खाणारी लोक उपाशी राहणार आहेत. शेतकऱ्याला एका रुपयात विमा दिला आहे. दीड कोटी लोकांनी याचा फायदा घेतला आहे. दीड वर्षांमध्ये १० हजार कोटी रुपयांची शेतकऱ्याला मदत केली आहे. तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा-

  1. INDIA Alliance press conference : भाजपा सरकार लोकांच्या समस्येवर चर्चा करायला तयार नाही-शरद पवार
  2. INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना

ABOUT THE AUTHOR

...view details