मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य आहेत. मात्र, असत्य घटनेचा आधार घेऊन ते अस वक्तव्य करतील अस कधी वाटले नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक वृत्त वाहिनीला एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अजित पवार आणि आपला पहाटे झालेला शपथविधी शरद पवार यांच्या संमतीनेच झाला होता असा दावा केला आहे. त्यावर पवार यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस : एका वृत्तवाहिनीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांना पहाटेच्या शपथविधीविषयी विचारले असता त्याबद्दल ही थेट शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. ती काही खालच्या पातळीवर चर्चा झालेली नाही. आणि पवारांसी चर्चा करूनच तो निर्णय घेण्याता आला होता असा खळबळजनक खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. तसेच, माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला आहे. यामध्ये पहिला उद्धव ठाकरेंनी केला आणि त्यानंत अजित पवार यांनी असही ते यावेळी म्हणाले आहेत.
मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला : यावेळी देवेंद्र फडणवीस अनेक विषयांवर बोलले आहेत. त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारव मोठा आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकू शकले नसते, पण त्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला तुरुंगात टाकण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी दिली होती असा थेट आरोपच फडणवीस यांनी केला आहे. त्याचवेळी मी कधीही पोलीस विभाग अपमानीत केला नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचे माझ्याबाबतीत प्रेम होते, त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांची मला माहिती मिळायची. त्यांनी मला तुरुंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले. परंतु, तसेच होऊ शकले नाही असही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना प्रिय झाली : विधानसभेच्या (2019)च्या निवडणुका माझ्या नावाने लढवल्या गेल्या. त्यामध्ये स्वत: उद्धव ठाकरे यांनी माझ्या नावाचा उल्लेख करत त्यांनी प्रचार केला. त्याचवेळी प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ज्यावेळी माझ्या नावाचा उल्लेख केला तेव्हा उद्धव ठाकरे टाळ्या वाजवत होते. परंतु, निवडणुका पार पडल्या तेव्हा आकडा समोर आला आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडले. आणि त्यांनी खोटा दावा करत आम्हाला फसवले असे म्हणत फडवीस यांनी जे झाले त्याला सर्वस्वी उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असही ते शिवसेना फुटीवर म्हणाले आहेत. तसेच, हे सगळे होत असताना उद्धव ठाकरे यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. आणि पुढील हा प्रकर घडला असेही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :मोठी बातमी! पहाटेचा शपथविधी शरद पवारांना विचारूनच; फडणवीसांचा गौप्यस्फोट