मुंबई - शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंचे प्रेम घेण्यासाठी आलो असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच शिवसैनिकांची उर्जा घेण्यासाठी आलो आहे. आमचे सगळे ठरले असून, योग्य वेळी योग्य निर्णय सांगू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सत्ता किंवा खुर्चीसाठी आम्ही एकत्र आलो नाही. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे करण्यासाठी एकत्र आलो आहोत. मुख्यमंत्री कोण यासंबधी चर्चा होऊ द्या. आमचे सगळे ठरले आहे. योग्य वेळी योग्य सांगायचे असतात असेही मुख्यमंत्री म्हणाले. यापुठे मराठवाड्याला दुष्काळा पहावा लागणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.