महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचा 'बी' प्लॅन, फडणवीसांचा मंगळवारी वानखेडेमध्ये शपथविधी समारंभ? - देवेंद्र फडणवीस

गतसरकारप्रमाणेच प्रथम सत्तास्थापन करण्याचे भाजपने निश्चित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 5 नोव्हेंबरला सायंकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Nov 1, 2019, 1:22 PM IST

मुंबई - गत सरकारप्रमाणेच प्रथम सत्तास्थापन करण्याचे भाजपने निश्चित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 5 नोव्हेंबरला सायंकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. हा समारंभ वानखेडे स्टेडियम येथे होणार असून समारंभ आयोजित करण्याची जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपविली आहे. समारंभाची जय्यत तयारीही सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - मोदींची इस्राईलमार्फत हेरगिरी ; देशवासियांवर पाळत ठेवल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला आहे. यामध्ये भाजप पक्ष सर्वाधिक जागांवर विजय मिळवून मोठा पक्ष ठरला आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची मात्र 'बार्गेनिंग पावर' वाढली आहे. त्यामुळे शिवसेनासुद्धा मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेवर अडून बसली आहे. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप मध्ये अद्यापही 'आमचाच मुख्यमंत्री' अशी भूमीका आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या 9 नोव्हेंबरला संपत आहे. तत्पूर्वी सरकार गठीत करणे महत्वाचे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी करण्याचा बी प्लॅन भाजपने आखला आहे. त्यामुळे 2014 मध्ये ज्या पद्धतीने भाजपने प्रथम सत्ता स्थापन करून नंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. त्याच पद्धतीने पुढे जाण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून त्यांच्यासोबत भाजपचे अन्य काही मोजक्या नेत्यांनाही मंत्री पदाची शपथ देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेदरम्यान शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शपथविधीनंतर विधीमंडळाच्या विशेष आधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथ दिली जाणार असून वडाळ्याचे सर्वात ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमले जाणार आहे.

हेही वाचा - अमरावतीत चारित्र्यवर संशय घेऊन पत्नीची हत्या, मुलाच्याही हत्येचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details