महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadanvis On Sharad Pawar : 'एजन्सीला घाबरून...', देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर जळजळीत टीका - BJP VS NCP

Devendra Fadanvis On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच २०१९ ला शिवसेनेने आम्हाला दगा दिल्यानंतर शरद पवार आमच्या सोबत यायला तयार होते. मग तेव्हा ते कुठल्यातरी एजन्सीला घाबरून आमच्या सोबत येणार होते का? असा खोचक सवालही फडणवीसांनी केलाय.

Devendra Fadanvis On Sharad Pawar
देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 5:16 PM IST

मुंबई Devendra Fadanvis On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने भाजपाकडून टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पवारांवर घणाघाती टीका केली आहे. २०१९ विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाला दगा दिल्याचा आरोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत यायला तयार झाला. तेव्हा शरद पवार कुठल्या एजन्सीला घाबरून आमच्या सोबत यायला तयार झाले? हे त्यांनी उघड करा, असा रोखठोक सवाल देवेंद्र फडणवीसांनी केलाय.



२०१९ ला शिवसेनेने आम्हाला दगा दिला : मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असताना फडणवीस म्हणाले की, २०१९ ला शिवसेनेने आम्हाला दगा दिल्यानंतर शरद पवार आमच्या सोबत यायला तयार होते. त्या पद्धतीची चर्चा त्यांनी केली होती. मग ते कुठल्यातरी एजन्सीला घाबरून आमच्या सोबत येत होते का? इतकेच नाही तर २०१७ ला सुद्धा ते आमच्यासोबत येणार होते. तेव्हा सुद्धा कुठल्या एजन्सीला ते घाबरून येत होते का? हा प्रश्नही निर्माण होतो.



पक्षातील लोक बाहेर का पडले : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, या आरोपावर प्रतिक्रिया देत फडणवीस म्हणाले की, पवार साहेबांना हे नीट माहितीये की, त्यांच्या पक्षातील लोक बाहेर का पडले? अजित दादांनी याबाबत स्पष्ट सांगितलंय. जेव्हा आमचं सरकार बदललं तेव्हा त्यांच्या सर्व आमदारांनी पवार साहेबांच्या मान्यतेने सह्या करून आमच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असं अजितदादांनी सांगितलय. म्हणून मला असं वाटतं की आता हे सर्व लोक निघून गेल्यानंतर त्यांच्यावर आरोप करणे हे अतिशय चुकीचे आहे.



अजित पवारांना शुभेच्छा :अजित पवार मुख्यमंत्री होणार याबाबत बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले आहेत की, राजकारणातील प्रत्येकाला वाटते की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा. परंतु आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. याबाबत मी कालही स्पष्टपणे बोललोय. परंतु काही लोकांना ते अजूनही समजत नाही. त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे, असा अप्रत्यक्ष टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावलाय.

हेही वाचा -

  1. यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन ; शरद पवार कराड, तर फडणवीस मुंबईत करणार अभिवादन
  2. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची सभा; बारामतीसह राज्याचे लक्ष
  3. 'शरद पवारांनी राष्ट्रविरोधी वक्तव्य करणे हे दुर्दैवी'

ABOUT THE AUTHOR

...view details