महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'यू टी' वाईट आहेत, 'वर्षा'च्या भिंतींवर आक्षेपार्ह लिखाण - Devendra Fadanvis criticize Udhav Thakary in mumbai

मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे फडणवीस कुटुंबाला वर्षा बंगलाही सोडावा लागला. वर्षा हे सरकारी निवास्थान सोडताना केलेल्या दिरंगाईनंतर आता जेव्हा हा बंगला नवीन मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी सुपुर्द करण्यात येत होता. त्यावेळी 'हू इज यू टी' म्हणजे 'यु टी' कोण आहेत...? म्हणजे यू टी वाईट आहेत. 'शट अप', अशी वाक्ये वर्षा बंगल्याच्या भिंतीवर लिहिली आहेत.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

By

Published : Dec 28, 2019, 4:54 PM IST

Updated : Dec 28, 2019, 7:32 PM IST

मुंबई- महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सध्या सोशल मीडियावरून आपली नाराजी आणि उद्विग्नता सातत्याने मांडत आहेत. त्यात आता वर्षा बंगल्याच्या भिंतीचीही भर पडलीय. वर्षा बंगल्याच्या भिंतीवर फडणवीस यांची लहान मुलगी ज्या खोलीत राहत होती, त्या खोलीच्या भिंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत 'वर्षा'च्या भिंतींवर आक्षेपार्ह लिखाण

हेही वाचा - नेरूळमध्ये आढळला साडेनऊ फूट लांबीचा अजगर

मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे फडणवीस कुटुंबाला वर्षा बंगलाही सोडावा लागला. वर्षा हे सरकारी निवास्थान सोडताना केलेल्या दिरंगाईनंतर आता जेव्हा हा बंगला नवीन मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी सुपुर्द करण्यात येत होता. त्यावेळी 'हू इज यू टी' म्हणजे 'यु टी' कोण आहेत...? म्हणजे यू टी वाईट आहेत. 'शट अप', अशी वाक्ये वर्षा बंगल्याच्या भिंतीवर लिहिल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्यांवर अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

Last Updated : Dec 28, 2019, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details