महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar Met Nawab Malik : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली नवाब मालिकांची भेट - Deputy Chief Minister Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar ) यांचे कट्टर समर्थक नवाब मलिक यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली (Ajit Pawar Met Nawab Malik) आहे. अजित पवार यांच्यासोबत सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांनी नवाब मलिक यांच्या घरी जाऊन तब्येतीची चौकशी केली. नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळला (Bail to Nawab Malik) आहे.

Ajit Pawar Met Nawab Malik
Ajit Pawar Met Nawab Malik

By

Published : Aug 16, 2023, 10:57 PM IST

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांना नुकताच वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते त्यांची भेट घेत आहेत. अशात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यासह सहकारीमंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनी मलिकांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

मलिकांच्या प्रकृतीबाबत चर्चा :राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या प्रमुखांनी मलिक यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. मात्र, नवाब मलिक कोणत्या गटात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली.




आमच्या दोन्ही पदव्या RFJ :राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज नवाब मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मलिकांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, नवाब मलिक हे आमचे सहकारी असून आम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करत आहोत. आमच्या दोन्ही पदव्या RFJ आहेत, म्हणजेच रिटर्न फ्रॉम जेल आहेत.

मलिकांना किडनी आजार :नवाब मलिक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. तुरुंगात असताना असा त्रास सहन करणे फार कठीण आहे. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून मी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. शरद पवारांनी माझ्या फोटोचा वापर करू नेय असे बजावले आहे. मात्र, आमचा एकच राष्ट्रवादी पक्ष आहे. शरद पवार आमचे नेते आहेत. मी मंत्रालयात शरद पवार यांचा मोठा फोटोही लावल्याचे भुजबळ म्हणाले. सुरुवातीपासूनच भाजपसोबत न जाण्याची आपली भूमिका भुजबळांनी स्पष्ट केली आहे.


हेही वाचा -

  1. Sharad Pawar In Kolhapur: पक्षफुटी नंतर शरद पवार यांची कोल्हापुरात 25 ऑगस्टला जाहीर सभा
  2. Nitin Raut On Sharad Pawar : शरद पवार भाजपासोबत गेल्यास काँग्रेसचा प्लॅन तयार? पवारांच्या गुप्त भेटीमुळे संभ्रमाचे वातावरण - डॉ. नितीन राऊत
  3. Supriya Sule on Meeting : नातं आणि राजकीय वैचारिकता वेगळी - सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details