महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलुंडमध्ये लष्कराचे युद्ध सामग्री प्रदर्शन, जवानांच्या चित्तथरारक कसरती - युद्ध सामग्री प्रदर्शन

महाराष्ट्र सेवा संघाच्या 'सॅल्युट इंडिया उपक्रमा'तर्फे शुक्रवार पासून सुरू झालेल्या प्रदर्शनाचा रविवारी शेवटचा दिवस होता. यावेळी जवानांनी युद्धाच्या वेळेस काय परिस्थिती असते हे या सरावातून दाखवले.

mumbai
मुलुंडमध्ये भारतीय लष्कराचे युद्ध सामग्री प्रदर्शन

By

Published : Dec 16, 2019, 7:57 AM IST

मुंबई -भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे व युद्ध सामग्रीचे सामान्यजनांना दर्शन घडावे. याकरिता मुलुंड पूर्वच्या वामनराव मुरांजन शाळेच्या शारदा नीलयम् संकुलात 'वीरशक्ती' हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

मुलुंडमध्ये भारतीय लष्कराचे युद्ध सामग्री प्रदर्शन

लष्कराचे कार्य व आव्हाने यांची जवळून ओळख व्हावी, तसेच शालेय मुलांना व युवावर्गाला लष्करातील विविध संधींची माहिती मिळावी या हेतूने महाराष्ट्र सेवा संघाच्या 'सॅल्युट इंडिया हा उपक्रम राबविण्यात आला. शुक्रवार पासून सुरू झालेल्या प्रदर्शनाचा रविवारी शेवटचा दिवस होता. यावेळी जवानांनी युद्धाच्या वेळेस काय परिस्थिती असते हे या सरावातून दाखवले.

हेही वाचा - '...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'

भारतीय लष्कराच्या 'सॅल्युट इंडिया उपक्रमा'मार्फत रविवारी शेवटच्या दिवशी घेण्यात आलेले हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुले होते. यावेळी मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. उखळी तोफा, सुरुंग, ग्रेनेड, रायफली यांच्या साह्याने आपले लष्कराचे पायदळाचे धाडसी जवान प्रत्यक्ष रणांगणावर कशी कामगिरी करतात. त्याची झलक महाराष्ट्र सेवा संघातर्फे आयोजित वीरशक्ती प्रदर्शनातील युध्दसराव ड्रीलमध्ये सर्वांना पहायला मिळाली. प्रदर्शन पाहून आबालवृध्द मंत्रमुग्ध झाले. प्रत्यक्ष युद्ध सुरू असतानाची परिस्थिती या प्रात्यक्षिक मधून उभी करण्यात आली होती. यातील प्रत्येक क्षण हा थरारक आणि अंगावर शहारे आणणारा होता. यावेळी नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या जवानांचे कौतुक केले.

हेही वाचा - राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार - रणजित सावरकर

ABOUT THE AUTHOR

...view details