मुंबई - मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील सुमारे 2238 झाडे तोडण्याचा प्रस्ताव नुकताच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ही झाडे तोडण्याला सेव आरे, फ्रायडे फॉर फ्युचर आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
आरे कॉलनीतील कारशेडसाठी २,२३८ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव मंजूर, पर्यावरण प्रेमींची निदर्शने - in mumbai by Environmental lovers
शासनाने विश्वासात केल्याने याविरोधात आपली निराशा व्यक्त करण्यासाठी आज आरे कॉलनीतील कारशेडच्या जागेवर निदर्शने केली. यावेळी मुंबई मेट्रो 3 च्या प्रकल्प संचालिका अश्विनी भिडे व एमाआरव्हीसी यांच्या विरोधात नारेबाजी केली.
निदर्शने करताना पर्यावरणप्रेमी
शासनाने विश्वासात केल्याने याविरोधात आपली निराशा व्यक्त करण्यासाठी आज आरे कॉलनीतील कारशेडच्या जागेवर निदर्शने केली. यावेळी मुंबई मेट्रो 3 च्या प्रकल्प संचालिका अश्विनी भिडे व एमाआरव्हीसी यांच्या विरोधात नारेबाजी केली. आरेतील मोठया प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे भविष्यात येथील पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित पर्यावरण प्रेमींनी दिली.