महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Health Problems : मुंबई, दिल्लीतील नागरिकांच्या जीवाला धोका, वाचा, काय आहे प्रकरण? - प्रदुषण नागरिकांसाठी धोकादायक

राजधानी दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर ( Delhi most polluted city ) आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आर्थिक राजधानी मुंबई हे प्रदूषित शहर ( Mumbai second most polluted city ) असल्याचे समोर आले आहे. शहरातील प्रदुषण नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Air Pollution
Air Pollution

By

Published : Nov 11, 2022, 10:26 PM IST

Updated : Nov 11, 2022, 10:50 PM IST

मुंबई -देशभरातील चार महत्वाच्या शहरामध्ये राजधानी दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर ( Delhi most polluted city ) आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आर्थिक राजधानी मुंबई हे प्रदूषित शहर ( Mumbai second most polluted city ) असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चकडून ( SAFAR ) ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. मुंबई प्रदूषणात २०१८ मध्ये ७१ व्या क्रमांकावर होती. २०२१ मध्ये मुंबई १२१ व्या क्रमांकावर आहे. मुंबईमधील प्रदूषण ( Air Pollution ) कमी झाले असले तरी अद्यापही ते नागरिकांसाठी धोकादायक आहे.

राजधानी दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर

दिल्ली सर्वाधिक धोकादायक - हवेचा मानवी आरोग्यावरील ( Global air pollution ) परिणाम हा खूपच मोठा असतो. हवेतील छोटे मात्र धोकादायक धुलीकण ज्यांना पीएम २.५ अस म्हणतात. पीएम २.५ मुळे दमा, पक्षाघात, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार अधिक गंभीर होऊ शकतात. केंद्र सरकारच्या सफर या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये पीएम २.५ चे प्रमाण १९९, मुंबईमध्ये ८४, पुणे येथे ७८ तर अहमदाबाद येथे ६५ इतके नोंदवले गेले आहे. पदूषणाच्या ( Air Pollution in India ) बाबतीत दिल्ली सर्वाधिक धोकादायक शहर असल्याचे समोर आले आहे. यामुळे दिल्लीमध्ये ( Delhi ranks first in air pollution ) डिझेलच्या वाहनांवर महिनाभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत या विभागात सर्वाधिक प्रदूषण -मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात प्रदूषण ( Mumbai ranks in air pollution ) वाढले होते. त्यात काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत हवेतील धोकादायक धूलिकण म्हणजेच पीएम १० चे प्रमाण १४२ तर पीएम २.५ चे प्रमाण ८४ इतके नोंदवले गेले आहे. मुंबईमधील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी येथे २४६, चकाला अंधेरी येथे २४४, देवनार येथे २०७ नोंदवले गेले आहे. मुंबईमध्ये बीकेसी, चकाला आणि देवनार येथे सर्वाधिक प्रदूषण असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने शहरात श्वसनाचे आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.

मागील वर्षी प्रदूषणात मुंबई १२१ व्या क्रमांकावर -२०२१च्या ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार मुंबईत २०२०च्या तुलनेत २०२१ या वर्षांत ‘पीएम २.५’चे म्हणजेच २.५ मायक्रोमीटर व्यासाचे घातक सूक्ष्मकण प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले होते. २०२० या वर्षांत ४१.३ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे 'पीएम २.५'चे प्रमाण होते. त्यात वाढ होऊन २०२१ साली हे प्रमाण ४६.४ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे झाले. त्यामुळे मुंबई हे जगातील ६,४७५ प्रदूषित शहरांपैकी १२१ व्या क्रमांकाचे शहर ठरले होते. त्यामुळे २०२१ मध्ये ९,१०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. वायुप्रदूषणाच्या परिणामांवर १ अब्ज ३० कोटी अमेरिकी डॉलर खर्च झाला आहे.

वायू प्रदूषणात मुंबईचा क्रमांक -जागतिक स्थरावर २०१८ मध्ये 'पीएम २.५'चे प्रमाण ५८.६ मायक्रोग्रॅम इतके असल्याने मुंबई ७१ व्या क्रमांकावर होती. २०१९ मध्ये 'पीएम २.५'चे प्रमाण ५८.६ मायक्रोग्रॅम इतके असल्याने मुंबई १६९ व्या क्रमांकावर होती. २०२० मध्ये 'पीएम २.५'चे प्रमाण ४१.३ मायक्रोग्रॅम इतके असल्याने मुंबई १४१ व्या क्रमांकावर होती. २०२१ मध्ये 'पीएम २.५'चे प्रमाण ४६.४ मायक्रोग्रॅम इतके असल्याने मुंबई १२१ व्या क्रमांकावर होती.

या उपायोजना करणार -मुंबईमध्ये सर्वाधिक प्रदूषण हे वाहनांमुळे होते. मुंबईत वाहनांची संख्या अधिक आहे. खोदकाम आणि बांधकाम यामुळे हवेमध्ये धुळीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. पालिकेकडून डम्पिंग ग्राउंडमध्ये उघड्यावर कचरा टाकला जातो. यामुळे मिथेन वायूचे प्रमाण वाढते. वायू प्रदूषणामुळे टीबी, फुफुस्साचे तसेच घशाचे विविध आजार होतात. यामुळे इतर आजारही होतात. लहान मुलांना वयोवृद्धांना याचा अधिक त्रास जाणवतो. प्रदूषण कमी करण्यासाठी कचऱयाची विल्हेवाट डम्पिंगमध्ये केली जाते ती बंद केली पाहिजे. खासगी गाड्यांचे प्रमाण कमी करून पब्लिक ट्रान्सपोर्ट असलेल्या बेस्टच्या एसी बसेस अधिक प्रमाणात चालवल्या पाहिजेत. बांधकाम साईटवर पाण्याची फवारणी करणे बंधनकारक करावे अन्यथा त्यांचे काम बंद करावे. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला पडणार नाहीत अशी छोटी झाडे लावली पाहिजेत. रस्ते आणि झाडे धुण्याकडे पालिकेने आणि सरकारने लक्ष दिले पाहिजे असे वनशक्ती संघटनेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी म्हटले आहे.


'पीएम २.५' चा कसा होतो प्रभाव -० ते ५० कमी प्रभाव५१ ते १०० संवेदनशील लोकांना श्वासोच्छवासाची किरकोळ. १०१ ते २०० फुफ्फुस, दमा आणि हृदयाचे आजार असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. २०१ ते ३०० दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यास बहुतेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. ३०१ ते ४०० दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास श्वसनाचे आजार. ४०१ ते ५०० निरोगी लोकांवर परिणाम करते आणि विद्यमान रोग असलेल्यांवर गंभीरपणे परिणाम करते.

Last Updated : Nov 11, 2022, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details