मुंबई:बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Greater Mumbai Municipal Corporation) पुढाकाराने आणि मे. युनायटेड वे मुंबई, मे. हिंदूस्थान युनीलिव्हर व एच.एस.बी.सी. या संस्थांच्या सहयोगातून, सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत 'जी उत्तर' विभागातील धारावी पंपींग परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक पध्दतीच्या दुमजली सार्वजनिक केंद्राच्या (Community Facilitation Centers) लोकार्पण प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, धारावी परिसरातील या एका सुविधा केंद्रात तब्बल १११ शौचकूपे आहेत. ते देशातील सर्वात मोठे 'सामुदायिक सुविधा केंद्र' ठरले आहे. या केंद्रामध्ये पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था आहे. तसेच लहान मुले आणि अपंगांकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या केंद्रामध्ये परिसरातील नागरिकांकरिता या सुविधा सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.वॉटर सिस्टीम, गरम पाण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल, कपडे धुण्यासाठी वॉशिंग सेंटर, तसेच याद्वारे तयार होणारे सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी पाण्याचे पुनर्चक्रीकरण करणारा प्रकल्प आदी अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. सदर शौचालयामुळे धारावी उदंचन केंद्राच्या आसपासच्या परिसरातील नाईक नगर, संग्राम नगर, शताब्दी नगर इत्यादी ठिकाणच्या जवळ-जवळ ५ हजार नागरिकांची सोय होणार आहे.
१० ठिकाणी 'सामुदायिक सुविधा केंद्र'
मे. युनायटेड वे मुंबई, मे. हिंदुस्तान युनिलिव्हर व एच.एस.बी.सी. या संस्थांच्या सहयोगातून आणि सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत व त्यांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध १० ठिकाणी 'सामुदायिक सुविधा केंद्र' उभारण्यात येणार आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित संस्था यांच्यादरम्यान सामंजस्य करार आज करण्यात आला आहे.
Community Facilitation Centers : देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक सुविधा केंद्राचे लोकार्पण - Community Facilitation Centers
मुंबईकरांना स्वच्छतेच्या सोयी एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने विविध कंपन्यांच्या व संस्थांच्या सहकार्याने सामुदायिक सुविधा केंद्रे (Community Facilitation Centers) उभारण्यात येत आहेत. ही केंद्रे पर्यावरण-पूरक असून येथे सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे. येथील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी दिली. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक सुविधा केंद्राचे (Largest public utility center) लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
या ठिकाणी उभी राहणार सार्वजनिक सुविधा केंद्र -
१. 'जी उत्तर' विभाग :- प्रेम नगर, धारावी.
२. 'जी उत्तर' विभाग :- काळा किल्ला, धारावी
३. एन विभाग :- भिम नगर, घाटकोपर (पश्चिम)
४. एन विभाग - साईनाथ नगर, घाटकोपर (पश्चिम)
५. 'एम पूर्व' विभाग - टाटा नगर, गोवंडी
६. 'एम पूर्व' विभाग - तानाजी मालूसरे मार्ग, गोवंडी
७. 'एम पूर्व' विभाग - गायकवाड नगर, चेंबूर
८. 'एच पूर्व' विभाग - दावरी नगर, सांताक्रुज (पूर्व)
९. 'एच पूर्व' विभाग - खेरवाडी वांद्रे (पूर्व)
१०. 'एच पूर्व' विभाग - कुचिकोरवे नगर, कलिना सांताक्रुज (पूर्व)