महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सकारात्मक! राज्यातील 12 जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट - corona patients decreased in state

राज्यासाठी एक सकारात्मक बाब समोर आली आहे. मागच्या 15 दिवसांत राज्यातील 12 जिल्ह्यांत कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, वाशिम, नंदुरबार, औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे.

कोरोना आलेख
कोरोना आलेख

By

Published : May 4, 2021, 12:43 PM IST

मुंबई -देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. राज्यात दिवसाला सरासरी 55 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तर देशात नव्या रुग्णांची नोंद होण्याची संख्या 3 लाखांच्या आसपास आहे. पीआयबीकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 12 जिल्ह्यांत रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

कोरोना रुग्णसंख्येत घट -

राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत (3 मे 2021) एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 47 लाख 71हजार 022 इतकी आहे, तर 70 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्याची स्थिती बिकट असली तरी राज्यासाठी एक सकारात्मक बाब समोर आली आहे. मागच्या 15 दिवसांत राज्यातील 12 जिल्ह्यांत कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, वाशिम, नंदुरबार, औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details