महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक! राज्यातील प्रमुख जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट - मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबादसह इतरही जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही बाब राज्यासाठी दिलासा देणारी ठरत आहे.

राज्यातील प्रमुख जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट
राज्यातील प्रमुख जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

By

Published : May 11, 2021, 3:38 PM IST

Updated : May 11, 2021, 9:29 PM IST

मुंबई -गेल्या काही महिन्यात राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे पुढे आले होते. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी राज्यसरकारकडून कडक निर्बंधही लावण्यात आले, शिवाय विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून आता राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी होतांना पहायला मिळत आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबादसह इतरही जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही बाब राज्यासाठी दिलासा देणारी ठरत आहे.

या प्रमुख जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णाची संख्या घटते आहे

मुंबई

मुंबईतील कोविड संसर्गाचा दर हा लपविण्याचा किंवा कमी दाखवण्याचा कोणताही प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाने केलेला नाही. दैनंदिन चाचण्या, बाधितांची संख्या, मृत्यूंची संख्या हे सर्व कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सरकारकडे नियमितपणे सर्व माहिती दिली जाते. जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये कोविड संसर्ग मृत्यू दर हा सरासरी ०.७१ टक्के इतका आहे. या कालावधीतील कोविड व्यतिरिक्त झालेले इतर मृत्यू जरी यात जमेस धरले तरी हा दर ०.९८ टक्के इतका म्हणजेच १ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. सद्यस्थितीत जागतिक कोविड मृत्यू दर हा २.११ टक्के इतका तर भारताचा मृत्यू दर हा १.१२ टक्के इतका आहे. म्हणजेच या दोन्ही तुलनांमध्ये मुंबईतील कोविड संसर्ग मृत्यू दर हा कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंत 57 लाख 61 हजार 689 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आत्तापर्यंत 67 लाख 99 हजार 86 रुग्ण आढळले असून गेल्या आठवड्याभरात 21 हजार 120 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठवड्याभरात 2 लाख 26 हजार 786 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत. १ मे ३,९०८ रुग्ण आढळून आले, त्यादिवशी ३७ हजार ६०७ चाचण्या करण्यात आल्या होत्या. २ मे ला ३,६७२ रुग्ण आढळून आले असून त्यादिवशी २८ हजार ६३६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. ३ मे ला २,६६२ रुग्ण आढळून आले असून २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. ४ मे रोजी २,५५४ रुग्ण आढळून आले त्यादिवशी २९ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. ५ मे रोजी ३,८७९ रुग्ण आढळून आले असून त्यादिवशी ३५ हजार ३७७ चाचण्या करण्यात आल्या, ६ मे रोजी ३,०५६ रुग्ण आढळून आले असून ३० हजार ९४२ चाचण्या करण्यात आल्या, ७ मे रोजी ३,०३९ रुग्ण आढळून आले असून ३५ हजार २२४ चाचण्या करण्यात आल्या. ८ मे रोजी २,६७८ रुग्ण आढळून आले असून ३३ हजार ३७८ चाचण्या करण्यात आल्या, ९ मे रोजी २,४०३ रुग्ण आढळून आले असून ३२ हजार ५९० चाचण्या करण्यात आल्या तसेच १० मे रोजी १,७९४ रुग्ण आढळून आले असून २३ हजार ०६१ चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नागपूर

नवीन आठवड्याची सुरूवात उपराजधानी नागपूरच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक झाली. गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद सोमवारी झाली. गेल्या २४ तासांत नागपूर शहरात आणि जिल्ह्यात २ हजार ५३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, ६ हजार ६८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे, अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१ हजार १४३ राहिली आहे. गेल्या आठवड्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ७५ हजारांच्या घरात गेली होती. नागपुरात 3 मे ते 10 मे या कालावधीत एकूण 13 लाख 8 हजार 636 कोरोना चाचणी करण्यात आले आहे. तर यात एकूण बाधित संख्या 27 हजार 248 इतकी आहे. तर 48 हजार 24 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने अ‌ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वेगाने खाली येत आहे आणि ही नागपूरच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक बाब म्हणावी लागेल.

पुणे

पुणे शहरात गेल्या आठ दिवसात 1 लाख 21 हजार 513 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 20 हजार 98 रुग्ण बाधित आढळून आले आहे. तर सोमवारी दिवसभरात १ हजार १६५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. शहरात दुसरी लाट आल्यापासून दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची रुगणसंख्या ही सर्वात कमी आहे. त्यामुळे, ही मोठी दिलासा देणारी बाब आहे. एकीकडे नव्या रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आलेली असताना दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, आज दिवसभरात ४ हजार १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे समाधानकारक चित्र आहे.

औरंगाबाद

औरंगाबाद शहरात रोज एक हजारांच्या जवळपास नवीन कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे मार्च महिन्यात पहायला मिळाले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रोज तीनशे ते चारशे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या कमी होत आहेत. मात्र मनपाने कोविड तपासणी कमी केल्याने रुग्ण कमी झाल्याचे बोलल्या जात आहे. मात्र मनपाने आरोप फेटाळून लावले आहेत. पूर्वी रोज पाच ते सहा हजार नागरिकांची दररोज चाचणी केली जात होती. त्यावेळी आपला पॉझिटिव्हीटी दर 20 च्या जवळपास गेला होता. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात होती. बाधित रुग्ण कमी झाले असून त्याचा रेट 12 टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे संपर्कातील नागरिक देखील कमी झाल्याने तपासणी आपोआप कमी झाली आहे. त्यात नागरिक देखील काळजी घेत असल्याने रुग्णसंख्या कमी करण्यात मदत मिळाली असल्याची, माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -कोल्हापुरात कोरोना रुग्णांना रोबो पोहोचवतोय औषधे!

Last Updated : May 11, 2021, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details