महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चर्चगेट स्थानकात सिमेंटचा पत्रा पडून वृद्ध ठार, दुसऱ्या घटनेत तीन महिला जखमी

अरबी समुद्रात सध्या वायू वादळ घोंघावत आहे. या वादळाच्या तडाख्याने मुंबईच्या चर्चगेट आणि बांद्रा पश्चिम येथे एक दुर्घटना घडली. जोराच्या वाऱ्याने चर्चगेटमध्ये सिंमेटचा पत्रा उडून एका एक वृद्ध ठार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत बांद्रा पश्चिम येथील एसव्ही रोडवरवर स्काय वॉकच्या पत्र्याच्या शेड  कोसळल्याने तीन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बांद्रा पश्चिम येथे स्काय वॉकच्या पत्र्याच्या शेड अंगावर कोसळून तीन महिला जखमी

By

Published : Jun 12, 2019, 5:30 PM IST

मुंबई- अरबी समुद्रात सध्या वायू वादळ घोंघावत आहे. या वादळाच्या तडाख्याने मुंबईच्या चर्चगेट आणि बांद्रा पश्चिम येथे एक दुर्घटना घडली. जोराच्या वाऱ्याने चर्चगेटमध्ये सिंमेटचा पत्रा उडून एका एक वृद्ध ठार झाला आहे. मधुकर अप्पा नार्वेकर (६२) असे त्या मृत वृध्दाचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत बांद्रा पश्चिम येथील एसव्ही रोडवरवर स्काय वॉकच्या पत्र्याच्या शेड कोसळल्याने तीन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

चर्चगेट येथे सिमेंटचा पत्रा अंगावर पडून एकाचा मृत्यू

चर्चगेट परिसरात सिमेंटचा पत्रा अंगावर पडल्याने ६२ वर्षीय मधुकर अप्पा नार्वेकर या वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर मधुकर नार्वेकर यांना तत्काळ जखमी अवस्थेत नजीकच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संदर्भात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

चर्चगेट येथे सिमेंटचा पत्रा अंगावर पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटनी घडली आहे.

बांद्रा पश्चिम येथे स्काय वॉकच्या पत्र्याच्या शेड अंगावर कोसळून तीन महिला जखमी

दुसरा अपघात बांद्रा पश्चिम येथील एसव्ही रोडवर घडला आहे. स्काय वॉकच्या पत्र्याच्या शेड अंगावर कोसळून यात दोन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर जखमी महिलांना नजीकच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मालिसा नजरात (३०), सुलक्षणा माझे (४१) , तेजल कदम (२७) अशी जखमी महिलांची नाव आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे स्कायवॉकला लावण्यात आलेले पत्र्याचे शेड निखळली आणि खाली चालत असलेल्या दोन पादचाऱ्यांवर पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details