मुंबई-पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथील पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा30वर गेला आहे.या घटनेत जखमी झालेल्या23वर्षीय युवकावर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र,मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. 2जुलै रोजी मुसळधार पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडली होती.
मालाड भिंत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 30 वर, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू - पिंपरी पाडा
पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथील पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 30 वर गेला आहे.
पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेचे जलाशय आहे.या जलाशयाच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती.ही संरक्षक भिंत2जुलै रोजी रात्री पावसात कोसळली.त्याखाली दबू मृत पावलेल्यांचा आकडा आता30वर गेला आहे.या ठिकाणी दगडी भिंत होती.त्याखाली ४० वर्ष लोक राहत होते.गेल्या तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी नव्याने भिंत बांधण्यात आली.ती कमी जाडीची आणि सुमारे ३० फूट उंच भिंत होती.या भिंतीला पाणी जायला छिद्रे ठेवण्यात आली नव्हती.यामुळे मुसळधार पावसात या भिंतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ही भिंत कोसळली.याप्रकरणी भिंत बांधणारा कंत्राटदार आणि संबंधित पालिका अधिकारी दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.