मुंबई -अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा पती राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकले आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी त्यांची चौकशी केली आणि चौकशीअंती त्यांना अटक केली. राज कुंद्रावर अश्लील सिनेमे बनवून अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा आरोप आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले. यानंतर 23 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात आणखी नवे कनेक्शन समोर येऊ लागले आहेत. याच प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोन्ही अभिनेत्री नावदेखील आता समोर येत आहे.
राज कुंद्रा आणि शर्लिन चोप्रा यांच्यात करार -
गुन्हे शाखेतील सूत्रांच्या माहितीनुसार, शर्लिन चोप्रा आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये एक करार झाला होता. हा करार शर्लिन चोप्रा आणि राज कुंद्रा याची कंपनी आर्म्सप्राइम मीडिया यांच्यात झाला होता. भारताबाहेर असणाऱ्या काही ॲप्सला अश्लील कंटेंट पुरवण्यास संदर्भात हा करार झाला होता. शर्लिन चोप्रा सेमी पॉर्नोग्राफी करत आपले एक ॲप चालवत होती. या ॲपमधून तिला फार मिळकत मिळत नव्हती. यानंतर शर्लीन चोप्राने राज कुंद्रा भेट घेतली. या भेटीदरम्यान करारावर बोलणी झाली. अश्लील कंटेंट पुरवणे आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 50 टक्के भाग हा वाटून घेणे यावर या भेटीत एकमत झाले आणि दोघांमध्ये करार करण्यात आला. त्या करारावर खुद्द राज कुंद्राच्या स्वाक्षर्या आहेत.
जून 2019 ते जुलै 2020 या एक वर्षाच्या दरम्यान राज कुंद्रा यांनी या पॉर्नोग्राफी इंडस्ट्रीतून चांगले पैसे कमावले. दरम्यान, शर्लिन चोप्राला याच एका वर्षाच्या काळात जाणीव झाली की, आपल्याला यातून काही पैसे मिळत नाहीत करारानुसार आपल्याला पैसे दिले जात नाही याची जाणीव शर्लिन चोप्राला झाली. दरम्यान याच काळात करार संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर शर्लिनने स्वतःचं ॲप सुरू केलं. याच काळात ला काही पैसे देखील मिळाले. मात्र, नंतर तिच्या ॲपवरील कंटेंट हा पायरेटेड होऊ लागला. यानंतर शर्लिन यासंदर्भात पोलिसात एक तक्रार दिली. पुढे फेब्रुवारी 2019 मध्ये शर्लिनने एक जबाब दिला होता. यात आपल्याला कशा पद्धतीने राज कुंद्राने कसे पॉर्नइंडस्ट्रीमध्ये ढकलले आहे, यासंदर्भात सांगितले.
याच वर्षाच्या सुरुवातीस राज कुंद्रा याचे नाव पोलिसांना सांगितलं होते की, त्यांने कंपनीचे शेअर्स विकले आहेत. तसेच कंपनीमधून इन्व्हेस्टमेंट आणि एक्झिट सगळे डॉक्युमेंट पोलिसांना दिले आहेत.