मुंबई - बोरीवली येथील 'सेंट डी एम हायस्कूल'च्या पाठीमागे असणाऱ्या नदीत दुपारी 2.20 च्या सुमारास एक मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे.
बोरीवली येथील नदीत आढळला मृतदेह - नदीत
बोरीवली मधील दौलत नगर येथील सेंट डी एम हायस्कूलच्या पाठीमागे असणाऱ्या नदीत एका पुरूषाचा मृतदेह आढळला आहे.
बोरीवली येथील नदीत आढळला मृतदेह
मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिलेल्या माहिती अनुसार, दुपारी 2.20 च्या सुमारास येथील नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. व्यक्तीला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संतोष बाळकृष्ण संडीम, असे 43 वर्षीय मृताचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.