महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार; म्हणाले, मोदी हटाव...

बिहारमधील पाटणा येथे सध्या देशातील विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ही बैठक परिवार वाचवण्यासाठी असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 23, 2023, 3:51 PM IST

मुंबई - देशातील भाजप सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी भाजपा विरोधातील सर्वच पक्ष एकत्र येत आहेत. मोदी विरुद्ध विरोधक असे समीकरण सध्या देशात पाहायला मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे बिहारमधील पाटणा येथे 15 विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. केंद्रातील सत्तेतून भाजपाचा पायउतार करण्यासाठीच आम्ही सर्व एकत्र आल्याचे विरोधकांनी बैठकीपूर्वी प्रतिक्रिया दिल्या. यावर बैठकीचा समाचार घेत याचा कोणताही परिणाम होणार नसून, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

पाटणा येथील बैठक ही मोदी हटाव नाहीतर परिवार बचाव बैठक आहे. सर्व परिवारवादी पार्टी एकत्र आले असून, आपला परिवार कसा वाचू शकेल, आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल याकरता हे सर्व लोक एकत्रित आले आहेत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाटण्यातील बैठक परिवार बचाव - बिहारमधील पाटणा येथील बैठक ही मोदी हटाव नाहीतर परिवार बचाव बैठक आहे. सर्व परिवारवादी पार्टी एकत्र आले असून, आपला परिवार कसा वाचू शकेल, आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल याकरता हे सर्व लोक एकत्रित आले आहेत. कारण या पक्षांचा राज्य चालवणे हा यांचा धंदा आहे. हे त्यांचे प्रोफेशन आहे तर भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्यासाठी ही सेवा आहे. गेल्या वेळेस देखील या सर्व लोकांनी एकत्र येऊन बघितले होते. जनता ही मोदी यांच्या पाठीशी आहे. आता तर जनता 2019 च्या निवडणुकीपेक्षा जास्त प्रमाणात 2024 साली भारतीय जनता पार्टी आणि मोदींच्या पाठीमागे उभी राहील. त्यामुळे अशा प्रकारचे कितीही मेळावे घेतले तरी मला वाटत नाही कोणताही त्याचा परिणाम होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा ठाकरेंना टोला - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार मेहबूबा मुफ्ती यांच्या नावावरुन भारतीय जनता पार्टीला टोमणे मारत होते. आता देखील मारत असतात. उद्धव ठाकरे आता मेहबूबा मुफ्तींसोबत चालले आहेत, आता त्यांच्या बाजूलाच बसलेले आहेत. सत्तेसाठी आणि परिवार वाचवण्यासाठी, परिवार पार्टी वाचवण्यासाठी सगळ्या प्रकारच्या कॉम्प्रमाईज करण्यास तयार आहेत. मात्र, याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -

  1. Patna Opposition Meeting : विरोधी पक्षांची बैठक सुरू, २०२४ ला भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती, लालू यादवही सहभागी
  2. Patna Opposition Meeting: नितीश कुमारांच्या लग्नातील मिरवणुकीचा नवरदेव कोण?'.. विरोधी पक्षांच्या बैठकीवर भाजपचा प्रश्न
  3. Patna Opposition Meeting: विरोधकांची एकजूट कधीच शक्य नाही, पाटणामध्ये फोटो सेशन आहे - अमित शाह

ABOUT THE AUTHOR

...view details