मुंबई Dawood Ibrahim : फरार दहशतवादी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या आईच्या आणि बहिणीच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा ५ जानेवारीला फेमाचे अधिकारी लिलाव करणार आहेत. या लिलावात सामील होण्यासाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. रत्नागिरीतील खेड जिल्ह्यातील मुंबके गावात दाऊदच्या बंगल्याचा देखील काही वर्षांपूर्वी लिलाव झाला आणि तो बंगला लिलावात वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी खरेदी केला होता. आता पुन्हा वकील असलेल्या भूपेंद्र कुमार भारद्वाज यांना दाऊदच्या आईच्या आणि बहिणीच्या नावे असलेली शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. भारद्वाज यांनी आज आयकर भवन येथे जाऊन लिलावात सामील होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
11 मालमत्तांचा केला लिलाव : शेतजमिनी असलेल्या रत्नागिरीतील चारही मालमत्ता दाऊद इब्राहिमच्या आई अमिना बी आणि बहीण हसीना पारकर यांच्या नावावर असल्याची माहिती वकील भारद्वाज यांनी दिली. या चार मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके येथे आहेत. गेल्या नऊ वर्षांत दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास 11 मालमत्तांचा सफेमा अधिकाऱ्यांनी लिलाव केला आहे. मुंबईत होणारे हे लिलाव सक्षम प्राधिकारी आणि स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स ऍक्ट किंवा सेफेमा यांच्या प्रशासकाद्वारे केले जातील, जे केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकाराखाली आहेत. कुख्यात गुंड आणि भारताला मोस्ट वॉन्टेड असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिम याची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शेत जमिनीचा लिलाव शुक्रवारी होणार आहे. हा लिलाव ई ऑक्शन स्वरूपात होणार आहे. http.://education.auction.auctiontiger.net या वेबसाईटवरून ई ऑक्शन पद्धतीने ऑनलाइन स्वरूपात इच्छुक या लिलावात सामील होऊ शकतात.