महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Parenting Tips : तान्ह्या बाळांच्या रडण्याकडे दुर्लक्ष करणे घातक? त्याकडे लक्ष देणे गरजेचे - Parenting Tips

प्रयत्न करूनही जेव्हा बाळ रडणे थांबवत नाही तेव्हा पालकांना खूप तणाव आणि चिंता वाटू लागते. बाळाचे पहिले बोलणे म्हणजे रडणे, अभिव्यक्त होणे म्हणजे रडणे. कधी ते सुखावणारे असते तर कधी​अत्यंत त्रासदायक असते. 7-8 महिने तरी ही बाळांची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. जी पालकांना, काळजी घेणाऱ्यांना शक्य तितक्या लवकर बाळांकडे जाण्यास प्रवृत्त ( Babies cry for many reasons) करते.

Parenting Tips
बाळ रडणे

By

Published : Oct 19, 2022, 2:40 PM IST

मुंबई :अनुभवी पालकांना बहुतेक वेळा बाळाच्या रडण्य़ाच्या कारणांची जाणीव असते. लहान मुले अनेक कारणांमुळे रडतात ( Babies cry for many reasons) आणि रडणे ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे. मात्र काही वेळा ती चिंताजनक वाटू लागते. परिणामी, काही वेळी ही परिस्थीती नवीन पालकांना त्यांच्या पालकत्वाच्या कौशल्यावर शंका निर्माण करणारे असू शकते. बाळांच्या रडण्यामागील संभाव्य कारणे आम्ही खाली दिली आहेत.

भूक लागणे :लहान मुलांमध्ये रडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ( Babies hunger ) भूक. सुरूवातीला आईच्या दुधावर अवलंबून असल्याने आणि भूक छोटी असल्याने त्यांना वारंवार भूक लागते. आणि सू-वाटे त्यांच्या शरिरातील पाणी कमी होते. बाळाच्या भूकेत आणि आहाराच्या वेळेवर तफावत झाल्यास बाळाचे रडणे सुरू होते. बहुतेक वेळा बाळांच्या रडण्याचे कारण हेच असते.

झोपण्याची वेळ :जेव्हा बाळ खूप वेळ जागे असते तेव्हा ते खूप खेळकर असू ( Babies sleep time ) शकते. त्यांना झोपायचे आहे हा सिग्नल ही ते रडण्याच्या माध्मातून देतात. ते जांभई देतात किंवा त्यांच्या चेहऱ्याला, डोळ्यांना स्पर्श करतात. जेव्हा त्यांनी खूपच झोप येते. तेव्हा ते अगदी जोरजोरात रडतात.

शरीराचे तापमान :काही बाळांना गरमी सहन होत ( Babies body temperature ) नाही. त्यांना थोड जरी गरम झाले तरी ते रडू लागतात. विशिष्ट तापमानाबद्दल त्यांची नापसंती व्यक्त करण्यासाठी, लहान मुले रडतात. तुमचे बाळ गरम किंवा थंडीमुळे रडत आहे की नाही हे शोधण्यासाठी, त्यांना स्पर्श करा आणि त्यांच्या शरीराचे तापमान तपासा. गरमीत त्यांना घाम येतो. त्यावरून समजून जा की त्यांना गरम होत आहे. पटकन त्यांचे कपडे काढल्यास ते रडण्याचे थांबतात.

डायपर अलर्ट : गलिच्छ डायपर हे बाळ वारंवार रडण्याचे आणखी एक कारण ( Babies diaper alert ) आहे. अस्वच्छता बाळाच्या बावतीत राखू नये. त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. मलमूत्रामुळे त्यांच्या नाजूक त्वचेवर जळजळ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्यांचे डायपर बदलता तेव्हा त्यांची ती जागा नेहमी नाजूक कपड्यांनी स्वच्छ करा.

श्वास घेण्यास त्रास :बाळांना अनेक वेळा त्यांच्या श्वासोच्छवासाचे नियमन कळत ( Babies Difficulty in breathing ) नाहित. त्यांना ते जाणवण्यास थोडा वेळ लागतो आणि ते भरपूर हवा श्वासाच्या माध्यमातून घेतात. याशिवाय, गॅस हा त्यांच्या पचन प्रक्रियेचा एक सामान्य भाग आहे. आणि काही वेळा त्यांच्या अपरिपक्व पचनसंस्थेमुळे लहान मुलांनाही गॅस होतो. गॅस गेल्यानंतर बाळांना आराम वाटला पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details