महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चेंबूर ते वडाळा दरम्यान चालत्या लोकल प्रवासात 2 तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी - तरुणांवर

चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान प्रवासी लोकलमध्ये जात असताना, दरवाज्यात उभे राहून मोसीन मोहमद नावाचा तरुण जीवघेणी स्टंटबाजी करत होता. तर दुसरा युवकदेखील मोसीनसारखीच स्टंटबाजी करत होता, अशी माहिती आहे.

स्टंटबाजी करणारा तरुण

By

Published : Aug 1, 2019, 2:21 PM IST

Updated : Aug 1, 2019, 4:37 PM IST

मुंबई - धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांना वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सकाळी चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान प्रवासी लोकलमध्ये जात असताना, दरवाजात उभे राहून मोसीन मोहम्मद नावाचा तरुण जीवघेणी स्टंटबाजी करत होता. तर दुसरा तरुण देखील मोसीन सारखीच स्टंटबाजी करत होता, अशी माहिती आहे.


दरम्यान, याच लोकलने प्रवास करणारे रेल्वेचे जीआरपी सचिन पाटील व दुसरे एक कर्मचारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी वडाळा रेल्वे स्थानक येताच त्या दोघांना ताब्यात घेतले आणि वडाळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले, यानंतर पोलिसांनी या तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली, अशी माहिती लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली आहे.

लोकल प्रवासात 2 तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी


रेल्वे प्रशासन वारंवार स्टंटबाजीसारखे प्रकार करू नये, यासंदर्भात जनजागृती करत असते. मात्र, तरी देखील या स्टंटबाजांना आवर घालण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Last Updated : Aug 1, 2019, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details