मुंबई - चेंबूर वाशी नाका येथे आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दहीहंडी उत्सवासाठी सकाळपासूनच वेगवेगळी गोविंदा पथके शहर व उपनगरात उपस्थिती लावत आहेत. चेंबूरच्या दहिकाला उत्सवाला सुरुवात झाली आहे.
चेंबूरचा दहिकाला उत्सव : आगाऊ खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देणार - मुंबई बाकमी
दहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मनसे चेंबूर अध्यक्ष कर्ण (बाळा) दुनबळे व प्रशिक सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे. या उत्सवातील दहीहंडीची इतर आगाऊ खर्चाची जी रक्कम असेल ती सांगली-कोल्हापूर-सातारा व कोकणातील महापुरात मृत्युमुखी पडलेल्या व बेघर झालेल्या नागरिकांना देण्यात येणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
दहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मनसे चेंबूर अध्यक्ष कर्ण (बाळा) दुनबळे व प्रशिक सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे. या उत्सवातील दहीहंडीची इतर आगाऊ खर्चाची जी रक्कम असेल ती सांगली-कोल्हापूर-सातारा व कोकणातील महापुरात मृत्युमुखी पडलेल्या व बेघर झालेल्या नागरिकांना देण्यात येणार आहे, असे आयोजकाकडून सांगण्यात आले. या दहीहंडीचे आकर्षण परदेशी पाहुन्यांना पण मोठ्या प्रमाणात असते. आज सकाळपासूनच जर्मनी येथील आंद्रेस व्हिन्टेर हे वाशी नाक्यावरील दहीहंडीचा आनंद घेत आहेत.