मुंबई- मुंबईसह देशभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबईची दहीहंडी देशात आकर्षणाचा विषय असतो. मुंबईत गोविंदा पथके हंड्या फोडत जल्लोष करीत आहेत. मात्र, यावर्षी दहीहंडी उत्सवावर महाराष्ट्रातील पूर परिस्थिती आणि राज ठाकरे यांच्या ईडी प्रकरणाचा प्रभाव दिसत आहे.
मुंबईतील दहीहंडी उत्सवावर कोल्हापूर-सांगली पूर आणि ईडीचे सावट
ऐन विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर अंमलबजावणी संचालनालयाने कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरेंची चौकशी केली. याचा प्रभाव देखील दहीहंडी उत्सवावर पहायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईतील बहुतांशी दहीहंड्यावर राज ठाकरे यांचे ईडी प्रकरण आणि कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील पूराचा प्रभाव दिसून येत आहे.
वाशी नाका चेंबूर येथे चेंबूर मनसे अध्यक्ष कर्ण दूनबळे हे गेले 14 वर्षापासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात. ही दहीहंडी 9 थराची असून हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास भरघोस बक्षीसे दिली जातात. मात्र, यावर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त नागरिकांना सरकार व काही खाजगी संस्था मदत करीत आहेत. तर यावर्षी मुंबईतील मोठ्या रकमेच्या दहीहंडी मंडळांनी उत्सव रद्द करीत सर्व रक्कम पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. त्यातच ऐन विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर अंमलबजावणी संचालनालयाने कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरेंची चौकशी केली. याचा प्रभाव देखील दहीहंडी उत्सवावर पहायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईतील बहुतांशी दहीहंड्यावर राज ठाकरे यांचे ईडी प्रकरण आणि कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील पूराचा प्रभाव दिसून येत आहे.
चेंबूरच्या वाशीनाका येथील दहीहंडीला सकाळ पासून शहरातील व उपनगरातील गोविंदा पथक उपस्थिती लावत आहेत. यावर्षी पुरुषांसोबत महिला, मुलीं दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील गोविंदाना कोणत्याही प्रकारचे संकट आले तरी सण साजरा करण्यात मागे नसल्याचे दिसत आहे.