मुंबई : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरी देशभरात प्रसिद्ध आहे. या चित्रपट नगरीला बॉलीवूडचे घर देखील संबोधले जाते. ही चित्रनगरी 521 एकरमध्ये ही चित्रपटनगरी पसरलेली आहे. या परिसरात 16 मोठे स्टुडिओ आहेत तर 200 पेक्षा अधिक इनडोअर स्टुडिओ आहेत. येथे एका वेळेत 1 हजार चित्रपटाचे चित्रीकरण होऊ शकते. असा हा भव्यदिव्य, हॅपनिंग परिसराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. येथे आल्यावर तुम्हाला तुमच्या आवडीचे कलाकार, आवडीच्या एखाद्या मालिकेचे चित्रीकरण सहज पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात या नगरीचे रुप पालटणार आहे.
लवकरच टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार : दादासाहेब फाळके चित्रपट नगरीचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून फिल्मसिटीमध्ये सेटवर, स्टुडिओमध्ये आधुनिक सुधारणा करण्यात येणार आहेत. सोबतच रस्ते, वीज आणि सेटवर मुबलक पाणी पुरवठा याकडेही लक्ष दिले जाणार आहेत. दादासाहेब फाळके चित्रनगरी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला लागूनच आहे, त्यामुळे तेथे वन्य प्राणीजीवांचा वावर असतो. त्यासह काही दुर्मिळ वृक्ष संपदादेखील तेथील परिसरामध्ये आहे. इतकेच नव्हे तर फिल्मसिटी परिसरामध्ये रेल्वे ट्रेन आणि प्लॅटफॉर्म बांधण्याचा विचार निर्णयाधीन आहे. येत्या काही दिवसांमध्ये या नवीन संकल्पनेसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
21 दिवसाची कार्यशाळा : सोबत चित्रीकरणाद्वारे मिळणारा महसूल कशाप्रकारे वाढवण्यात येईल, यावर मीडिया आणि एन्टरटेन्मेंट रिपोर्टदेखील तयार करण्यात येणार आहे. 21 दिवसीय कार्यशाळेचे आयोजनासाठी मराठी चित्रपटांना राज्यशासन अनुदान देत असते. देशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतात. या महोत्सवासाठी पात्र होणाऱ्या चित्रपटांच्या संदर्भात अनेकांना माहिती देणे, शासनाच्या विविध योजना, अनुदान, चित्रीकरणासाठी योग्य स्टुडिओची निवड कशी करावी, यासाठी फिल्मसिटीद्वारे 21 कार्यशाळेचे आयोजन केले जाते. दरम्यान अशीच एक कार्यशाळा जुलै महिन्यात होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी, कोणते निकष लावले जातात याची माहिती देखील या कार्यशाळेमधून दिली जाते.