महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cycle Rider Ajay Mhatre : सायकल वेड्या अवलियाचा रायगड ते लडाख सायकलचा प्रवास ; अजय म्हात्रेची अनोखी कहाणी

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सायकलींगची आवड सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी अजय म्हात्रे या तरुणाने सायकल प्रवासाचा विडा उचलला आहे. रायगड ते असा प्रवास पूर्ण केल्यानंतर अजयचा आता नवीन टारगेट रायगड ते नेपाळ किंवा बांगलादेश असे असणार (Ajay Mhatre traveled Raigad to Ladakh by cycling) आहे. आणि याचे नियोजन ही अजयने सुरू केले आहे.

Cycle Rider Ajay Mhatre
सायकल वेड्या अवलियाचा रायगड ते लद्दाख सायकलचा प्रवास

By

Published : Nov 27, 2022, 1:43 PM IST

मुंबई :आवड असली की सवड निघते, ही मराठी भाषेतील मन अजय म्हात्रे या तरुणाला तंतोतंत लागू (Cycle Rider Ajay Mhatre) पडते. अगदी सामान्य कुटुंबातल्या या तरुणाने सायकल प्रवासकरून थेट रायगड ते लडाख असा टप्पा पार केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सायकलींगची आवड सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी त्यांनी हा सायकल प्रवासाचा विडा उचलला आहे. रायगड ते लडाख असा प्रवास पूर्ण केल्यानंतर अजयचा आता नवीन टारगेट रायगड ते नेपाळ किंवा बांगलादेश असे असणार (Ajay Mhatre traveled Raigad to Ladakh by cycling) आहे. आणि याचे नियोजन ही अजयने सुरू केले आहे.

सायकल वेड्या अवलियाचा रायगड ते लडाख सायकलचा प्रवास

लांब पल्ल्याचा प्रवास सायकलवर :आवड ही माणसाला काहीही करायला लावते. आपल्या आवडीतील वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या व्यक्तींची अनेक उदाहरणे आपल्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात. मात्र रायगडच्या पेण येथे राहणारा तरुण अजय म्हात्रे याने थेट आपल्या सायकल चालवण्याच्या आवडीतून रायगड ते लडाख असा लांब पल्ल्याचा प्रवास सायकलवर केला आहे. अजय या तरुणानी जवळपास अडीच हजार किलोमीटरचा हा प्रवास 25 दिवसात पूर्ण केला. या प्रवासात अनेक अडचणी अजयसमोर उभा राहिला. मात्र या सर्व अडचणीवर मात करून रायगड ते लडाख हा प्रवास त्याने पूर्ण केला. सध्या प्रत्येकजण इंधनाच्या वाहनांना प्राधान्य देत आहे. तरुण मुले देखील खूप कमी प्रमाणात सायकल चालवताना दिसतात. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. यासोबतच सायकल चालवल्यामुळे पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होत नाही, हा संदेश देण्यासाठी रायगड ते लद्दाख असा अडीच हजार किलोमीटरच्या सायकलचा प्रवास त्याने केला.



असा झाला प्रवास सुरू :सायकल चालवण्याची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बाजूच्या गावात प्रवास करून कॉलेजला जाण्यासाठी अजय च्या वडिलांनी त्याला सायकल आणून दिली होती. तिथूनच अजयचा सायकलवरचा हा प्रवास सुरू झाला. सायकलचे आधीपासूनच आवड असल्यामुळे रोज अजयने सायकल चालवण्याची प्रॅक्टिस सुरू केली. मात्र अजय यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अजयने ड्रायव्हर म्हणून नोकरी सुरू केली. मात्र नोकरी करताना त्यांनी आपला छंद सोडला नाही. सायकल चालवण्याचा त्याचा छंद पाहता त्याच्या मालकाने त्याच्या मुलाची जुनी सायकल अजयला दिली. तिथूनच अजयने जाण्याची तयारी सुरू (traveled Raigad to Ladakh by cycling) केली.

अडीच हजार किलोमीटरचा प्रवास :अजयने मे महिन्यात लडाखला जाण्याचा प्रवास सुरू केला. मात्र यासाठी त्यांनी महिला महिने तयारी केली अजय हा पेनला राहत असला तरी नोकरीसाठी तो नवी मुंबईत जातो. नोकरी करून सायकल चालवण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळणार नाही, याची जाणीव अजयला होती. म्हणूनच पेन ते नवी मुंबई असा 45 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सुरू केला. रोज नोकरीला सायकलवर येजा करून जवळपास 90 ते 100 किलोमीटर तो सायकल चालवत होता. आणि यातूनच त्यांनी आपली सायकल चालवण्याची तयारी सुरू केली होती. रायगड किल्ला प्रवासात अजय रोज दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर सायकल चालवत होता. सात राज्यातून अजयचा हा सायकलचा प्रवास होणार होता. या सर्वाचा रोड मॅप अजयने आधी तयार केला. त्यानुसार त्यांनी आपला प्रवास सुरू केला होता. मात्र या प्रवासात अजयला केवळ दोन हजार रुपये खर्च आला. कारण ज्या दिवसापासून अजयने सायकलचा हा प्रवास सुरू केला, तेव्हापासून राहण्यासाठी आणि खाण्यासाठी त्याला स्थानिक लोकांनी मदत केली. झोपण्यासाठी अजय एक छोटा तंबू आपल्या सोबत घेऊन निघाला होता. यासोबतच रोजच्या गरजेच्या वस्तू त्यांनी सोबत घेतल्या होत्या. वाटेत मिळेल तिथे जेवणाची योजना त्यांनी बनवली होती. मात्र त्याचा हा सायकल प्रवास बघून जिथे जिथे त्यांनी दुपारी किंवा रात्री थांबण्याचा बेत केला तिथे तिकडच्या स्थानिक लोकांनी त्याला भरभरून मदत केली. त्याला जेवणाची सोय करून दिली. अजयचा हा प्रवास महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश राजस्थान हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश आणि लडाख येथून अजयचा हा पूर्ण सायकल प्रवास झाला. मात्र या सातही राज्यातून सायकल प्रवास करत असताना तेथील स्थानिक पोलिसांनी अजयला खूप मदत केली. अनेक वेळा पोलिसांनीच आपल्याला जेवणाची सोय देखील केली असल्याचे अजय आवर्जून (Ajay Mhatre traveled by cycling) सांगतो.



आता नवे टारगेट :रायगड ते लडाख असा सायकलचा प्रवास केल्यानंतर अजयचा आत्मविश्वास देखील बळावला आहे. त्याचा हा सायकल प्रवास बघून त्याच्यासोबत त्याच्या गावातल्या आणि इतर आसपासच्या गावातले पाच ते सहा तरुण आता त्याच्यासोबत सायकल चालवण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे अजयची आता एक टीम तयार झाली आहे. मात्र आता या पुढील टप्पा रायगड ते नेपाळ किंवा रायगड ते बांगलादेश असा सायकल प्रवास करण्याचा असल्याचा अजय सांगतो. मात्र यासाठी नोकरी सांभाळून हा सगळा प्रवास करावा लागणार आहे. यासाठी सुट्ट्यांचे नियोजन प्रवासाचे नियोजन तसेच भारत देश सोडून शेजारील देशात जाण्यासाठी जी काही कागदपत्रे तयारी करावी लागते, त्यासाठी तयारी सुरू केली आहे. एकूणच आपला पर्यावरणाचा आणि सायकलिंगचा संदेश देण्यासाठी आता अजय ध्येय वेडा झाला आहे. दरवर्षी आपण अशी एखादी लांबचा सायकल प्रवास करणार असल्याचे अजय आवर्जून सांगतो. तसेच अजयने रायगड ते लद्दाक सायकल प्रवास केल्यानंतर मित्रमंडळी नातेवाईक तसेच परिसरातले प्रतिष्ठित व्यक्तींकडून अजयला मदत करण्यासाठी लोकही पुढे येऊ लागली आहेत. मात्र कोणतीही मदत न घेता अजय लवकरच नवीन प्रवासाला निघणार (Ajay Mhatre) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details