मुंबई- रस्त्यावर भाजी विक्रेत्यासोबत केवळ १० रुपयांच्या वादातून ग्राहकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा दादर परिसरात घडली. भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या मानेवर आणि हातावर वार केले. त्यामध्ये ग्राहकाचा मृत्यू झाला.
मोहम्मद हमीद असे मृत ग्राहकाचे नाव आहे. हमीद सोमवारी रात्री दादर परिसरात भाजी घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आरोपी सोनीलालकडून भाजी खरेदी केली. यावेळी फक्त १० रुपये देण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान सोनीलालने रागाच्या भरात त्याच्याजवळील चाकून हमिदच्या मानेवर आणि हातावर वार केले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.