मुंबई - सध्या आमच्याकडे १० जखमी दाखल असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका जखमीचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. तर एक जखमी सेंट जॉर्ज रुग्णालयात शिफ्ट करण्यात आला आहे, अशी माहिती जीटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी दिली.
CSMT पूल दुर्घटना - अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या जखमीचा मृत्यू - Mukund Tayade
जीटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका जखमीचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी दिली.
डॉ. मुकुंद तायडे
या दुर्घटनेत जीटी रुग्णालयाच्या तीन परिचारिकांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना असून मृत परिचारिका या कामात खूपच चांगल्या होत्या, असेही डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले.
Last Updated : Mar 15, 2019, 2:35 PM IST