महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CSMT Fob Collapse : महापालिकेकडून उर्वरित पूल पाडण्याचे काम सुरू

घटनास्थळी जेसीबीच्या साहाय्याने पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

By

Published : Mar 15, 2019, 3:10 AM IST

Updated : Mar 15, 2019, 3:22 AM IST

मुंबई5

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हिमालया पादचारी पूल कोसळला. पादचारी पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर आता महापालिकेकडून उर्वरित पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पूल पाडण्याचे काम सुरू

घटनास्थळी जेसीबीच्या साहाय्याने पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दुर्घटनेमुळे सीएसएमटीजवळचा मार्ग बंद करण्यात आला होता. आता उर्वरित पूल पाडून पहाटेपर्यंत येथील वाहतूक पूर्वरत करण्यात येणार आहे.

Last Updated : Mar 15, 2019, 3:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details