महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID-19 : जमावबंदीचा आदेश धाब्यावर... अन् मुंबईकर रस्त्यावर

राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पण, आज सकाळपासून मुंबईतील पश्चिम दृतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा दिसून आल्या.

वाहनांची गर्दी
वाहनांची गर्दी

By

Published : Mar 23, 2020, 12:58 PM IST

मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. सर्व लोकल, बस, रेल्वे सेवा बंद करून लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. राज्यातील शहरी भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पण, मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खरेवाडी येथे मुंबईकर जमावबंदीच्या आदेशाला पायदळी तुडवताना दिसले.

परिस्थितीचा आढावा घेताना प्रतिनिधी

मोठ्या संख्येने नागरिक आपल्या दुचाकी, चारचाकी घेऊन रस्त्यावर उतरले होते. तर काही रिक्षा-टॅक्सीचालक ही प्रवासी वाहतूक करत होते. त्यामुळे पोलिसांनी सकाळी येथे नाकाबंदी करत कारवाई सुरू केली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासून पुढे सोडले जात होते. तर विनाकारण बाहेर पडलेल्यांचा वाहन परवाना जप्त करत त्यांना पिटाळून लावण्यात येत आहे.

हेही वाचा -COVID-19: मुंबई, ठाण्यात आजपासून वृत्तपत्र बंद...

ABOUT THE AUTHOR

...view details