मुंबई - मुलुंड पश्चिममधील एका निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात एक भली मोठी मगर तळ ठोकून होती. या मगरीची सुटका करण्यात वन विभागासह 'रा आणि वर्ल्ड लाइफ' या प्राणी संस्थेला यश आले आहे.
मगरीला 'स्वप्ननगरी'तून बाहेर काढण्यात यश हेही वाचा -वारिस पठाणांवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली, म्हणाले..
मुलुंड पश्चिमेतील स्वप्ननगरी परिसरामध्ये हे संयुक्त बचावकार्य राबवण्यात आले. दोन महिन्यांपासून ही मगर पाण्याबाहेर काढून तिला सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, ती सापडत नव्हती. अखेर आज सकाळी ही मगर पाण्याबाहेर आली आणि तिला यशस्वीरीत्या या परिसरातून बाहेर काढण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा -डोनाल्ड ट्रम्प यांचे हवेतील व्हाईट हाऊस आणि बीस्ट कार, ही आहेत वैशिष्ट्ये