मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्यासाठी संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईतील विविध परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. याचा शहरात सकारात्मक परिणाम होत आहे. मुंबईसारख्या शहरात एरवी घडणाऱ्या मोठ्या गुन्ह्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.
1 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान मुंबई शहर तसेच उपनगरात खून, दरोडा, बलात्कार आणि दंगलीसारख्या घटना कमी झाल्या आहेत. यावरच आजचा हा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.
गेल्या दोन महिन्यात मुंबई शहरातील 94 पोलीस ठाण्यांतर्गत घडलेले गुन्हे -
हत्या - एप्रिल 8, मार्च - 12
खुनाचा प्रयत्न - एप्रिल 11, मार्च 27
दरोडा - एप्रिल 0, मार्च 1
चेन स्नॅचिंग- एप्रिल 0, मार्च 14
खंडणी- एप्रिल 4, मार्च 13