मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या संलग्न ६०० ते साडेसहाशे महाविद्यालय आहेत. ज्यामध्ये सर्व प्रकारचे आधुनिक अभ्यासक्रम शिकवले जातात. मुंबई विद्यापीठाचा मोठा पसारा पसरलेला असताना या नामांकित आणि प्रख्यात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. मात्र त्यामध्ये एक उमेदवार असे आहेत ज्यांनी विद्यापीठाचा पैसा स्वत: साठी वापरला असा आरोप त्यांच्यावर आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हा आरोप आहे. कुलकर्णी यांनी विद्यापीठाचा पैसा वापरून स्वत: साठी 30 लाख रुपयांची गाडी घेतली, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तशी नोटीस देखील पाठवली आहे, असे मुंबई युनिव्हर्सिटी टीचर असोसिएशनने आपल्या पत्रात म्हटलेले आहे. मुंबई युनिव्हर्सिटी टीचर असोसिएशनने हे पत्र राज्यपालांकडे पाठवलेले आहे.
आर्थिक गैरव्यवहार : पराग काळकर हे देखील पाच उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठांमध्ये वाणिज्य विभागामध्ये असताना आर्थिक गैरव्यवहार केला. त्याबाबत पुणे येथे त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल आहे. त्यांनी 2017 ते 18 या काळामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार केला होता. त्या संदर्भातील गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. हा पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधान कलम अंतर्गत 409 34, 406, 420 याशिवाय इतर गुन्हे दाखल आहे.