वाराणसी :यूपी एसटीएफ (उत्तर प्रदेश) तसंच ठाणे पोलिसांच्या संयुक्त पथकानं एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक केलीय. दोन्ही आरोपी अनेक वर्षापासून फरार होत. अनिल सरोज उर्फ विजय, सुनील सरोज उर्फ संजय अशी या दोन आरोपींची नावं आहेत. हे दोघेही जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 1994 साली ठाणे इथं एकाच कुटुंबातील 5 जणांची सामुहिक हत्या करण्यात आली होती. यात दोघांचाही यात सहभाग होता.
चार जणाची निर्घृण हत्या :या प्रकरणी यूपी एसटीएफ वाराणसी युनिटचे अतिरिक्त एसपी विनोद कुमार सिंह यांनी सांगितलं की, 1994 मध्ये अनिल सरोज, त्यांचा भाऊ सुनील सरोज यांनी राज नारायण प्रजापती त्यांची पत्नी जगराणी (28), तीन मुलं प्रमोद (5), चिंटू (2), पिंटू (3) मुलगी पिंकी (1) यांची चॉपरनं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यामुळं घटनास्थळी त्यावेळी खळबळ उडाली होती. या संदर्भात काशिमीरा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघांना ठोकल्या बेड्या :त्याचवेळी पोलीस तपासात कालिया चौहान उर्फ अमरनाथ चौहान, रा. नोनावटी पोलीस स्टेशन, बडागाव जि. वाराणसी, अनिल सरोज, सुनील सरोज यांची नावे समोर आली होती. कालिया चौहान उर्फ अमरनाथ चौहान याला मुंबई पोलिसांनी यापूर्वीच अटक करून तुरुंगात पाठवले होतं. पण, अनिल सरोज, सुनील सरोज हे 1994 पासून फरार होते. या प्रकरणी 7 ऑक्टोबर 2023 रोजी अनिल सरोज, त्याचा भाऊ सुनील सरोजसोबत तो 7 सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून एसटीएसनं अनिल सरोज, सुनील सरोज यांना अटक केली.
वारंवार वाद : त्याचवेळी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत सांगितले की, अनिल सरोज, त्याचा भाऊ सुनील सरोज हे 1994 साली मुंबई मीरा रोड भाईंदर इथं राहत होते. राज नारायण प्रजापती हे त्यांच्या शेजारी कुटुंबासह राहत होते. एके दिवशी अनिल सरोज यांच्या सुटकेसमधून ३ हजार रुपये गायब झाले. त्याचवेळी राजनारायण प्रजापती यांच्या मुलांनी हे पैसे गायब केल्याचा संशय अनिल सरोज यांना होता. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यामुळेच 16 नोव्हेंबर 1994 रोजी जेव्हा राजनारायण प्रजापती आपल्या कामावर गेले. त्यानंतर सुनियोजित पद्धतीनं अनिल सरोज, सुनील सरोजसह त्यांचे साथीदार कालिया चौहान उर्फ अमरनाथ चौहान यांच्यासोबत मिळून राजनारायण प्रजापती यांच्यासह त्यांची पत्नी चार मुलांची चॉपरनं निर्घृण हत्या केली होती.
हेही वाचा -
- ED Raid on Bollywood Production : महादेव बेटिंग अॅप प्रकरणी बॉलिवूड प्रॉडक्शन हाऊसमध्ये ईडीची मोठी छापेमारी; बॉलिवूड विश्वात खळबळ
- Pune Accident News : पुण्यात हिट अॅंड रन ? दारूच्या नशेत कारचालकानं अनेक वाहनांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Nagpur Rape Case : नागपूर हादरलं; पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणीवर अतिप्रसंग