महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोल पंपावर ग्राहकांचे 'एटीएम कार्ड क्लोनिंग' करून पैसे लुटणाऱ्या टोळीला अटक - एटीएम कार्ड क्लोनिंग

एटीएम सेंटर व पेट्रोल पंपावर एटीएम क्लोन करून लुटणाऱ्या चौकडीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 8 ने अटक केली आहे.

टोळीसह पोलीस पथक
टोळीसह पोलीस पथक

By

Published : Jan 11, 2020, 10:26 AM IST

मुंबई- तुमच्याजवळ असलेल्या बँकेचे एटीएम किंवा क्रेडिट कार्डचा डेटा हा सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी एटीएम सेंटरमध्ये एटीएमचा डेटा कार्ड स्कीमरद्वारे हॅक करून पैसे लुटण्याचे प्रकार घडले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 8 ने केलेल्या कारवाई दरम्यान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांच्या एटीएमचे कार्ड स्कीमरने डेटा हॅक करून त्याद्वारे एटीएम क्लोनिंग करून पैसे काढणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.

एटीएम कार्ड क्लोनिंग करून पैसे लुटणाऱ्या टोळीला अटक


मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात 4 जानेवारी रोजी क्रेडिट कार्ड व डेबिट मधून पैसे परस्पर काढून घेण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

चार जणांच्या चौकशीत समोर आले आहे की, यातील मुख्य हितेश अग्रवाल या आरोपीने अलीबाबा डॉट कॉमवरून एटीएम स्किमर, रीडर यांच्यासह इतर साहित्य मागून घेतले होते. त्याद्वारे क्रेडिट कार्ड क्लोनिंगचे काम तो करत होता. क्रेडिट कार्ड क्लोन करण्यासाठी लागणारा डेटा मिळविण्यासाठी त्याने काशीमिरा येथील एका पेट्रोल पंपावर काम करणारे राजेश गौडा व उमेश लोकरे या दोन आरोपींना नेमले होते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचा एटीएमचा पिन क्रमांक लक्षात ठेवून दोन्ही आरोपी त्यांच्या खिशात लपविलेल्या स्कीमरवर कार्ड स्वाईप करून मिळालेल्या डेटा हितेश अग्रवाल याला देत असे.

हेही वाचा - भाजपच्या 'त्या' पदाधिकाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी - आमदार मनिषा कायंदे

मुख्य आरोपी हितेश अग्रवाल हा मिळालेल्या डेटाचा वापर करत बनावट एटीएम कार्डवर क्लोनिंग करून हैदर अली या आरोपीस विविध एटीएममधून पैसे काढण्यास पाठवत असे. या चारही आरोपींनी आतापर्यंत शेकडो जणांना लाखो रुपयांना लुबाडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - 'कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करावी'

ABOUT THE AUTHOR

...view details