महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर' - नागपूर हज हाऊस बातमी

महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : May 5, 2021, 6:41 PM IST

मुंबई- महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासाठी हज हाऊसचा ताबा तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर विभागातही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य विभागाच्या 4 मेच्या आकडेवारीनुसार नागपूर शहरात काल (दि. 5 मे) 2 हजार 689 नव्या रुग्णांची नोंद झाली. तेथील वाढत्या रुग्णांची उपचाराची सोय होण्याच्या दृष्टीने नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, मंत्री मलिक म्हणाले.

हज हाऊसची इमारत सहा मजली असून त्यात 40 खोल्या आहेत. शिवाय 28 स्वच्छतागृहे व एक भोजनकक्ष आहे. नियमीत कालावधीमध्ये येथे सुमारे 700 लोकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. इमारतीमधील काही किरकोळ कामे केली जात असून अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनामार्फत हे कोविड सेंटर चालवले जाईल, असेही मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा -अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; मराठा आंदोलकांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details