महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची चाचणी होणार वाहनताळाच्या जागीही; बीएमसीने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय - covid 19 test

मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा एक हजाराच्या पार गेला आहे. ज्या याठिकाणी रुग्ण आढळू येत आहेत अशी ठिकाण पालिकेने कंटेनमेंट एरिया म्हणून घोषित केली आहेत. मुंबईत अशी ३८१ ठिकाणे आहेत. या विभागातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पालिकेने घराघरात जाऊन तसेच विभागात क्लिनीक लावून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

covid 19 test
आता कोरोनाच्या चाचण्या पालिकेच्या वाहनतळांच्या जागीही

By

Published : Apr 11, 2020, 6:04 PM IST

मुंबई - शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चाचण्या वाढवण्यावर पालिकेने भर दिला आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून येतात त्या ठिकाणी पालिका घराघरात जाऊन चाचण्या करत आहेत. त्याचबरोबर आता पालिकेच्या १७ वाहनतळांवर कोरोनाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांच्याकडून लपवले जात, असल्याने इतरांनाही लागण हानीची शक्यता असल्याने पालिकेने चाचण्या करण्याला प्राधान्य दिले आहे.

मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा एक हजाराच्या पार गेला आहे. ज्या याठिकाणी रुग्ण आढळू येत आहेत अशी ठिकाण पालिकेने कंटेनमेंट एरिया म्हणून घोषित केली आहेत. मुंबईत अशी ३८१ ठिकाणे आहेत. या विभागातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पालिकेने घराघरात जाऊन तसेच विभागात क्लिनीक लावून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यामधून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमधील लोकसंख्या पाहता कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून, पालिकेने चाचण्या करण्यावर भर दिला आहे.

पालिकेच्या १७ सार्वजनिक वाहनतळावर कोरोनाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. पालिकेने त्यासाठी थायरोकेअर, मेट्रोपोलिस, एसआरएल, ईन्फर्न, सबअर्बन डायनोस्टीक या ५ प्रयोगशाळांशी करार केला आहे. या प्रत्येक वाहनतळांवर दिवसाला सुमारे २०० चाचण्या तर एकूण १७ वाहनतळांवर ३ हजारांपेक्षा जास्त चाचण्या करता येतील, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाला आहे.

सार्वजनिक वाहनतळांची नावे -

भायखळा
काळाचौकी
शिवडी
परळ-शिवडी

आर्टेशिया इमारत

लोअर परळ
इंडिया बुल्स फिनान्स सेंटर

एलफिन्स्टन
कोहिनूर मिल

दादर
एक्सर व्हिलेज

बोरीवली प.
विकास प्लाझा

मुलुंड प.
रूणवाल ऑडिटोरियम

मुलुंड प
रूणवाल ग्रीन

नाहूर कांजूर व्हिलेज

कांजूरमार्ग आर माॅलजवळ

विक्रोळी

ABOUT THE AUTHOR

...view details