महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 490 वर; मुंबईत सर्वाधिक 278 रुग्ण - corona update maharashtra

आज (शुक्रवारी) राज्यात 67 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 43 मुंबई येथील असून 10 जण मुंबई परिसरातील आहेत. पुणे 9, अहमदनगर 3, वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 490 झाला आहे.

covid 19 patient
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 490 वर; मुंबईत सर्वाधिक 278 रुग्ण

By

Published : Apr 3, 2020, 10:15 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये आज (शुक्रवारी) नव्याने 43 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 278 झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेने कळवले आहे. राज्यात आज 67 नवे रुग्ण आढळून आले असून राज्यातील आकडा 490 वर पोहचला आहे.

मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज 29 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 ते 30 मार्च दरम्यान ज्यांच्या चाचणी करण्यात आलेल्यांपैकी 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 14 जणांचा समावेश आजच्या आकडेवारीत करण्यात आला आहे. यामुळे मुंबईमधील एकूण रुग्णांचा आकडा 278 झाला आहे. मुंबईत 2 जणांचा मृत्यू झाला असल्याने मृतांचा आकडा 18 झाला आहे.

राज्यात 67 नवे रुग्ण -
आज (शुक्रवारी) राज्यात 67 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 43 मुंबई येथील असून 10 जण मुंबई परिसरातील आहेत. पुणे 9, अहमदनगर 3, वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 490 झाला आहे.

शुक्रवारी 6 जणांचा मृत्यू -

आज राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार, बदलापूर, ठाणे, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून मुंबईमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details