महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : रविवारी ११३ नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७४८

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात नवीन ११३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४८ झाली आहे. राज्यात एकूण १३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे.

COVID 19 latest update in maharashtra
राज्यातील ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, रविवारी ११३ नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७४८

By

Published : Apr 6, 2020, 9:28 AM IST

मुंबई -जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना विषाणूची साथ वेगाने पसरत आहे. राज्यात आत्तापर्यंतकोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४८ झाली आहे. यामध्ये आता आणखी ११३ नवीन रुग्णांची भर पडली आहे.आत्तापर्यंत राज्यात १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी रविवारी झालेल्या मृत्यूपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे.

1) कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली येथील एका ६७ वर्षीय महिलेचा रविवारी संध्याकाळी मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते.


2) कस्तुरबा रुग्णालयात एका ६४ वर्षीय पुरुषाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.


3) नायर रुग्णालयात एका ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.


4) केईएम रुग्णालय मुंबई येथे एका ६० वर्षीय पुरुषाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.


5)कस्तुरबा रुग्णालयात एका ५२ वर्षीय पुरुषाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह या आजारासोबत तो एचआयव्ही बाधितही होता.


6) केईएम रुग्णालय मुंबई येथे एका ७० वर्षीय महिलेचा राविवारी रात्री मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा जुनाट आजार होता त्यामुळे ती डायलिसीसवर होती.


7) चेंबूर येथील एका खाजगी रुग्णालयात एका ५५ वर्षीय पुरुषाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केला नव्हता. तथापि तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याने अनेकदा तो प्रवासी वाहतूकीसाठी विमानतळावर येत - जात असे.


8)कस्तुरबा रुग्णालयात एका ७७ वर्षीय पुरुषाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह हे आजार होते.


9) चेंबूर येथील खाजगी रुग्णालयात ८० वर्षीय पुरुषाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. या रुग्णाने परदेश प्रवास केलेला नव्हता. या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, अपस्मार अशा व्याधी होत्या. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला होता.


10) करोना बाधित रुग्णाची निकट सहवासित असलेल्या ६० वर्षीय महिलेचा रविवारी मध्यरात्री पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते.


11) पुण्याच्या ससून रुग्णालयात ५२ वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नाही. त्याला मधुमेहाचा त्रास होता.


12) औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी एका ५८ वर्षाच्या बॅंक अधिका-याचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय्रोगाचा त्रास होता. नजीकच्या काळात मुंबई वगळता त्यांनी कोठेही प्रवास केलेला नव्हता.


13) जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे रविवारी दुपारी एका ७७ वर्षीय आत्यंतिक स्थूल असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. शहरातील एका खाजगी रुग्णालयाने तिला संदर्भित केले होते.

कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४५ झाली आहे.


राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -

१. मुंबई - बाधित रुग्ण 458, मृत्यू ३०

२.पुणे - (शहर व ग्रामीण भाग) बाधित रुग्ण १००, मृत्यू - ५

३. सांगली - बाधित रुग्ण २५, मृत्यू - ०

४. मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा व जिल्हे - बाधित रुग्ण - ८२, मृत्यू - ६

५. नागपूर - बाधित रुग्ण - १७, मृत्यू - ०

६. अहमदनगर - बाधित रुग्ण - २१, मृत्यू - ०

७. लातूर - बाधित रुग्ण - ८ , मृत्यू - ०

८. औरंगाबाद - बाधित रुग्ण -७, मृत्यू १

९. बुलढाणा - बाधित रुग्ण - ५, मृत्यू १

१०. यवतमाळ, उस्मानाबाद - बाधित रुग्ण - प्रत्येकी ४, मृत्यू - ०

११. सातारा - बाधित रुग्ण - ३, मृत्यू - ०

१२. कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव - बाधित रुग्ण -२, मृत्यू - १ (जळगाव)

१३.सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशिम, अमरावती, हिंगोली - बाधित रुग्ण - प्रत्येकी १, मृत्यू - १ (अमरावती)

१४. इतर राज्य - बाधित रुग्ण -२, मृत्यू - ०

एकूण रुग्ण ७४८ तर, आत्तापर्यंत एकूण ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६,५८६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता. त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे. तर त्यांच्या निकटसहवासितांपैकी ५ जण पिंपरी चिंचवड येथे येथे करोना बाधित आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी ५१९ टीम काम करत आहेत. तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४३९ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९६ नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. राज्यात या प्रकारे एकूण ३०७८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details