महाराष्ट्र

maharashtra

मुंबईतील कोरोना मृतांची नोंदणी आता गुगल फॉर्मद्वारे

By

Published : Jun 28, 2020, 12:26 PM IST

मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने 16 जून रोजी तब्बल 862 मृत्यूंची नोंद महापालिकेला करावी लागली होती.

mumbai covid 19
मुंबईतील कोरोना मृतांची नोंदणी आता गुगल फॉर्मद्वारे

मुंबई - मुंबईमधील रुग्णालये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर उपाय म्हणून, पालिकेने रुग्णालयांना मृत्यूंची नोंद 48 तासात करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने मृत्यूंची नोंद करण्यासाठी 29 जूनची अंतिम मुदत दिली आहे. 1 जुलै पासून गुगल फॉर् द्वारे रुग्णालयांना मृत्यूंची नोंद करावी लागणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने 16 जून रोजी तब्बल 862 मृत्यूंची नोंद महापालिकेला करावी लागली होती. रुग्णालयांकडून मृत्यूंची उशिरा नोंद केली जात असल्याने पालिका आयुक्तांनी 48 तासात मृत्यूंची नोंद करण्याचे आदेश रुग्णालयांना दिले आहेत. मात्र, त्यानंतरही 48 तासात मृत्यूंची नोंद केली जात नसल्यामुळे पालिका आयुक्तांनी 29 जूनची डेडलाईन देत मृत्यूंची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन केले नाहीतर साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

रुग्णालयांकडून करोनाबाधितांच्या मृत्यूची माहिती पालिकेला वेळेवर मिळावी, एकाच व्यक्तीच्या मृत्यूची माहिती अनेक वेळा पाठविण्यात आल्यास घोळ निर्माण होऊ नये म्हणून, गुगल फॉर्मद्वारे 1 जुलैपासून मृतांची नोंद केली जाणार आहे. मृतांच्या नोंदीची माहिती ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाला पदसिद्ध अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. या अधिकाऱ्यांचे नाव, हुद्दा, मोबाइल क्रमांक, ई-मेल आदी माहिती पालिकेला कळवावी लागणार आहे. मृतांची माहिती पाठविण्यात विलंब झाल्यास वा माहितीमध्ये काही तफावत असल्यास संबंधित रुग्णालयातील पदसिद्ध अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details