मुंबई - राज्यात आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान, ईव्हीएम मशीनचे सील न काढताच मतमोजणी करण्यासाठी मशीन सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर मुंबई मतदार संघात घडला आहे. या प्रकरणी सर्वोदय भारतच्या उमेदवारांनी तक्रार दाखल केली आहे.
मतदानानंतर ज्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्या मशीनच्या 'की' ओपन करण्यात येत होत्या, त्यावेळी ज्याला सील लावण्यात आले होते ते सील न ओपन करताच लॉक तसेच ठेऊन या मशीन सुरू केल्या जात होत्या. अशा प्रकारे सील न उघडताच मतमोजणी सुरू केल्यास या मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होऊ शकते, असा आरोप करत सर्वोदय भारत या पक्षाचे उत्तर मुंबईतील उमेदवार डॉ नवीन पांडे यांनी दिली आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
ईव्हीएमचे सील न खोलताच मतमोजणीसाठी मशीन केली सुरू, उत्तर मुंबईतील प्रकार - मतमोजणी
ईव्हीएम मशीनचे सील न खोलताच मतमोजणीसाठी सुरू करण्यात आल्याचा प्रकार उत्तर मुंबईत घडला आहे. या प्रकरणी सर्वोदय भारतच्या उमेदवारांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. .
उत्तर मुंबईतील उमेदवार डॉ नवीन पांडे
तसेच या प्रकरणाविषयी संपूर्ण चौकशी केल्यानंतरच येथील मतमोजणीचे निकाल जाहीर करावेत, अशी मागणी आपण केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.