मुंबई- राज्यात सोमवारी ६६१ केंद्रांच्या माध्यमातून ३६ हजार २६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
राज्यात आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४६ लसीकरण
राज्यात सोमवारी २२ हजार २०० आरोग्य कर्मचारी आणि १४ हजार ६६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. राज्यात सहा ठिकाणी लसीकरणासाठी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात सोमवारी २२ हजार २०० आरोग्य कर्मचारी आणि १४ हजार ६६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. राज्यात सहा ठिकाणी लसीकरणासाठी ७ केंद्रे उभारण्यात आली आहेत.
जिल्हानिहाय आकडेवारी -
मुंबई उपनगर - ५३,५८०, पुणे - ४७,७२६, ठाणे - ४६,०१६, मुंबई - २५,९७२, नागपूर - २३,५८०, नाशिक - २२,७६९, अहमदनगर - २०,५६४, सातारा - १८,७०५, सोलापूर- १७,१८७, कोल्हापूर - १५,२१६, औरंगाबाद - १४,५०१, सांगली- १४,१११, वर्धा - १२,१२७, पालघर - १२,८७०, चंद्रपूर - १२,३२८, अमरावती- ११,५६१, जळगाव १०, ९०८, लातूर - ९,३७७, नांदेड - ८,९८९, बुलडाणा - ८,७६३, बीड - ८,३६८, यवतमाळ- ८,३००, धुळे - ७,९८५, जालना - ७,९९०, भंडारा - ७,११४, गडचिरोली- ७,२२४, रायगड - ७,०७७, रत्नागिरी - ७,०५८, नंदूरबार- ६,८५४, गोंदिया- ६,३१४, उस्मानाबाद- ६,००२, अकोला- ५,८२६, वाशीम - ४,३७१, सिंधुदुर्ग - ४,४०४, परभणी- ४,३६७, हिंगोली ३,९५४ अशा, एकूण ५ लाख ९ हजार ७४६ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.