मुंबई- राज्यात गुरुवारी ३४ हजार ८८९ आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ६ लाख ०८ हजार ५७० कर्मचाऱ्यांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली. गुरुवारी १३६ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
राज्यात ६ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण - कोरोना लसीकरण न्यूज
राज्यात गुरुवारी ८०९ केंद्रांवर ३४ हजार ७५३ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यात १५ हजार ५९३ आरोग्य कर्मचारी तर १९ हजार २९६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा सामावेश होता. राज्यात सहा ठिकाणी ७ केंद्रांवर कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे.
लसीकरणाची आकडेवारी -

जिल्हानिहाय आकडेवारी -
अहमदनगर- २४,५६८
अकोला- ७,५५८
अमरावती -१४,५८४
औरंगाबाद- १७,१२७
बीड- ९,१९४
भंडारा- ७,६८२
बुलडाणा- ९,३८६
चंद्रपूर- १४,४८८
धुळे- ८,८९७
गडचिरोली- ८,५१४
गोंदिया- ७,६४६
हिंगोली- ४,६२३
जळगांव- १२,६३३
जालना- ९,१८५
कोल्हापूर- १८,३४४
लातूर- ९,९४५
मुंबई- ३१,०१४
मुंबई उपनगर- ६५,२२६
नागपूर- २७,१२८
नांदेड- १०,५३५
नंदुरबार- ७,९२६
नाशिक- २८,२२४
उस्मानाबाद- ६,५१९
पालघर- १६,५३८
परभणी- ५,५४२
पुणे- ५५,८६८
रायगड- ९२४४
रत्नागिरी- ८,६९९
सांगली- १५,३३४
सातारा- २२,८५६
सिंधुदुर्ग- ५,३६९
सोलापूर- २,९८
ठाणे- ५८,३७७
वर्धा- १३,७२५
वाशीम- ४,९४९
यवतमाळ- १,०६०