मुंबई - मुंबईत मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. दिवाळीत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, दुकानदार आणि फेरीवाल्यांसाठी महापालिकेने विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित केली होती. त्यानंतर आता दादर, माहीम आणि धारावीत पेट्रोलपंप, बेकरी, ज्वेलरी, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजपासून विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ही मोहीम २९ डिसेंबरपर्यंत सुरू राहाणार असून, एकूण ५ ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा -मराठा समाजाला EWS आरक्षण; संघटनांमधून मात्र नाराजीचा सूर
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 'चेज द व्हायरस', 'मिशन झिरो' तर राज्य सरकारने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवत कोरोनावर नियंत्रण मिळवले. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीचा भाग असलेल्या धारावीसह दादर, माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र, तरीही कोरोनाचा एकही संशयित रुग्ण राहू नये यासाठी पालिका प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आता लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या पेट्रोलपंप, बेकरी, ज्वेलरी बनवणारे आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्याने दिली.
मेट्रो कामगारांच्याही चाचण्या -