मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यापासून हा प्रसार कमी झाला. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे आता कोरोना पुन्हा पसरतो की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रुग्णसंख्या वाढतेय : मुंबईमध्ये 27 फेब्रुवारीला 2, 28 फेब्रुवारीला 10, 1 मार्चला 8, 2 मार्चला 18, 3 मार्चला 11, 4 मार्चला 12, 5 मार्चला 13 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 27 फेब्रुवारीला 12, 28 फेब्रुवारीला 35, 1 मार्चला 32, 4 मार्चला 48, 5 मार्चला 46 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 10 च्या पुढे नोंद होत आहे. तर राज्यात सुमारे चार पटीने वाढली आहे.
सक्रिय रुग्णही दुप्पट : 27 फेब्रुवारीला मुंबईत 39, 28 फेब्रुवारीला 45, 1 मार्चला 47, 2 मार्चला 58, 3 मार्चला 64, 4 मार्चला 73, 5 मार्चला 74 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 27 फेब्रुवारीला 180, 28 फेब्रुवारीला 193, 1 मार्चला 198, 4 मार्चला 274, 5 मार्चला 285 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. 27 फेब्रुवारीच्या तुलनेत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे राज्यातही सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे.