महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक.. धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल, रूग्ण दुप्पटीचा कालावधी 78 दिवसांवर - धारावी कोरोना अपडेट

8 एप्रिलला धारावीत कोरोनाचे 15 रूग्ण आढळले होते. त्यानंतर ही संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. एकट्या धारावीत दिवसाला 70 ते 80 रूग्ण आढळत होते. आता मात्र हा आकडा 15 ते 25 पर्यंत खाली येऊ लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे येथील रूग्ण दुप्पटीचा कालावधी 78 दिवसांवर गेला आहे.

Health Check Up
आरोग्य तपासणी

By

Published : Jun 21, 2020, 7:24 PM IST

मुंबई - धारावीत 70 दिवसानंतर कोरोना रूग्ण आढळण्याची संख्या एक अंकी झाला होती. शनिवारी येथे फक्त सात रूग्ण आढळले होते. आज यात पुन्हा वाढ झाली असून दिवसभरात 12 कोरोना रुग्णांची नोंद झाली झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे येथील रूग्ण दुप्पटीचा कालावधी 78 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे धारावीत कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.

मुंबईच्या जी उत्तर भागातील धारावी, दादर आणि माहीम हे तीनही परिसर सुरवातीपासून कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यातही दाट लोकवस्तीच्या धारावी झोपडपट्टीत रूग्ण वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेची चिंता वाढली होती. मात्र, हळूहळू येथील परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

8 एप्रिलला धारावीत कोरोनाचे 15 रूग्ण आढळले होते. त्यानंतर ही संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. एकट्या धारावीत दिवसाला 70 ते 80 रूग्ण आढळत होते. आता मात्र हा आकडा 15 ते 25 पर्यंत खाली येऊ लागला आहे. शनिवारी 8 एप्रिलनंतर पहिल्यांदा रुग्णांचा आकडा एक अंकी झाला होता. धारावीसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. आज आढळलेला कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील दिलासादायकच आहे. आज येथे 12 रूग्ण आढळले असून एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहआयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

आत्तापर्यंत धारावीत कोरोनाचे एकूण 2 हजार 170 रूग्ण आढळले आहेत. जी उत्तर विभागाचा रूग्ण दुप्पटीचा कालावधी 45 दिवस असला तरी धारावीत मात्र तो 78 दिवस असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details