मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यातील रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच येथील जी.टी रुग्णालयातून कोरोनाचा रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना हा रुग्ण पळून गेला आहे.
मुंबईमधील कोरोना रुग्ण पळाला...शोधासाठी पोलीस पथक कार्यरत
संबंधित कोरोना रुग्ण गेल्या काही दिवसांपासून जी.टी रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. मात्र, मंगळवारी अचानक हा रुग्ण रुग्णालयामधून पळून गेला. रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या शोधासाठी आजाद मैदान पोलिसांची काही पथक काम करीत आहेत.
हेही वाचा-कोरोनाचा कहर...अमेरिकेत 70 हजाराहून अधिक लोकांचा बळी
संबंधित कोरोना रुग्ण गेल्या काही दिवसांपासून जी.टी रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. मात्र, मंगळवारी अचानक हा रुग्ण रुग्णालयामधून पळून गेला. रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या शोधासाठी आझाद मैदान पोलिसांची काही पथकं काम करीत आहेत. लवकरच या रुग्णाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी पुन्हा रुग्णालयात करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, रुग्णालयातून संबंधित रुग्ण पळाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.