मुंबई - तब्बल नऊ थर लावल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या जोगेश्वरीच्या जय गोविंदा पथकाने यंदा दहीहंडी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटात सर्वांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने गोपाळकाला साजरा केला जाईल. मात्र, एकही गोविंदा बाहेर पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले.
पथकातील गोविंदा व त्यांच्या परिवाराच्या सुरक्षिततेला प्राधान्य आहे. यंदा सण साजरा करता येणार नाही, याचे दुःख आहे. मात्र, सामाजिक भान जपणे तितकेच गरजेचे आहे. यंदा आम्ही कोरोनात गरजूंना मदत करून सामाजिक जबाबदारी पार पडत असल्याचे जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले. माहीम, वडाळा, दादर परिसरातील शिवसेना पुरस्कृत दहीहंडी देखील रद्द करण्यात आल्याचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून सांगण्यात आले.