मुंबई - जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता महाराष्ट्रातही वाढला आहे. आज राज्यात आणखी २८ कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. तर २४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा तर नागपूरमधील बाधित झालेल्या रुग्णांच्या सहवासात आलेल्या 4 जणांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी २ रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर, कोल्हापर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. तर १ रुग्ण गुजरात राज्यातील आहे. दरम्यान, आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षाच्या एका वृध्देचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा राज्यातील कोरोनामुळे झालेला 5वा मृत्यू आहे. आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात एका ८५ वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला. ही व्यक्ती कोरोना संशयित आहे. त्यांचे 2 नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे -
पिंपरी चिंचवड मनपा १३
पुणे मनपा १८
मुंबई ५१ मृत्यू ४
सांगली २४
नवी मुंबई , कल्याण डोंबिवली प्रत्येकी 6