महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 29, 2022, 11:09 PM IST

ETV Bharat / state

ACB Trap : एसीबीच्या सापळ्यात बांधकाम विभागाचा अधिकारी; २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

कंत्राटी पद्धतीने उपहारगृह चालविण्यास दरमहा ५० हजार रुपयांचा हफ्ता मागणाऱ्या हेमंत पांडुरंग राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक (arrested by ACB for accepting bribe) केली. उपविभागीय अधिकाऱ्यास (Construction Dept officer arrested by ACB) उपहारगृह चालविणाऱ्याकडून २५ हजार रुपये घेताना रंगेहाथ जेरबंद करण्यात आले आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime, ACB Trap

ACB Trap
एसीबीच्या सापळ्यात बांधकाम विभागाचा अधिकारी

मुंबई :वांद्रे येथील शासकीय विश्रामगृहात कंत्राटी पद्धतीने उपहारगृह चालविण्यास दरमहा ५० हजार रुपयांचा हफ्ता मागणाऱ्या हेमंत पांडुरंग राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक (arrested by ACB for accepting bribe) केली. राठोड सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी (Construction Dept officer arrested by ACB) म्हणून कार्यरत असून उपहारगृह चालविणाऱ्याकडून २५ हजार रुपये घेताना त्याला रंगेहाथ जेरबंद करण्यात आले आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime, ACB Trap

लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार :वांद्रे येथील शासकीय वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने उपहारगृह चालविण्यास दिले जाते. एका व्यावसायिकाने रीतसर परवानगी घेऊन या ठिकाणी उपहारगृह सुरू केले. सर्व परवानग्या घेऊनही वांद्रे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभाग कार्यालयातील अधिकारी हेमंत राठोड यांनी उपहारगृह चालविणाऱ्यास बोलावून घेतले. उपहारगृह पुढे चालू ठेवण्यासाठी दरमहा ५० हजार रुपये द्यावे लागतील असे राठोड याने तक्रारदारास सांगितले. २२ नोव्हेंबर रोजी मागणी केल्यानंतर राठोड याने पैशासाठी तगादा लावला. पैसे द्यायचे नसल्याने उपगृह चालविणाऱ्याने वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात लेखी तक्रार केली. मात्र, दुसरीकडे ५० हजार द्यायला शक्य नसल्याने २५ हजार रुपयांवर त्याने राठोड याच्यासोबत तडजोड केली.


त्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल :एसीबीने तक्रारीची शहानिशा केली आणि सोमवारी कार्यालयात सापळा रचला. तडजोडीमध्ये ठरल्याप्रमाणे उपहारगृह चालविणाऱ्याकडून २५ हजार रुपये घेताना राठोड याला रंगेहाथ पकडण्यात आले. राठोड याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details