महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Manipur Women : मणिपूर प्रकरणावर काँग्रेसच्या महिला आमदार संतप्त, पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक

मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पोहोचला आहे. विधानसभेत मणिपूर मुद्द्यावर सभापतींनी चर्चा होऊ न दिल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभागृहातून सभात्याग केला. महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, आमदार वर्षा गायकवाड यांना सभागृहात बोलू न दिल्याबद्दल विरोधकांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.

Manipur Women
यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

By

Published : Jul 21, 2023, 6:46 PM IST

यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

मुंबई :मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र केल्याच्या घटनेनंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले आहेत. विधिमंडळात मणिपूर प्रकरणावर चर्चा करण्यासंदर्भात अध्यक्षांनी परवानगी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी काँग्रेसच्या महिला आमदारांचे रौद्ररूप पाहायला मिळाले. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांना सभागृहात बोलू न दिल्याने काँग्रेस आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला.

बेटी बचाओ बेटी पढाओची अंमलबजावणी करा : मणिपुरातील घटना सर्वांना माहीत आहे. त्या महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दुर्दैवाने दोन महिने या घटनेची दखलही घेतली नाही. गुन्हाही दाखल झाला नाही. मणिपूर सरकार, केंद्र सरकारने या प्रकरणी कारवाई का केली नाही? असा सवाल आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करा :आज विधिमंडळात या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला, दुर्दैवाने आज आमचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रालाही या महिलांबद्दल सहानुभूती असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्याय मिळावा, अशी आम्ही मागणी केली. तसेच मणिपूर सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

राज्य सरकारचा निषेध : महिलांच्या सन्मानासाठी सभागृहात आवाज उठवायचा नसेल तर आवाज कुणासाठी उठवायचा, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. एकाही महिला आमदाराला बोलू न दिल्याने आम्ही महाराष्ट्र सरकारचा निषेध करत, आपला संताप व्यक्त केला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर सभागृहात बोलणार असून राज्यपालांची भेट घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.


माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, विरोधी पक्षाच्या महिला आमदारांना सभागृहात बोलू न देणे हे सरकारचे लक्षण असल्याचे सांगत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुंडगिरी इतकी निर्लज्ज कशी असू शकते? मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त करू. मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे. त्याबाबत आम्हाला राज्य सरकार बोलण्यापासून रोखू शकत नाही, असे ठाकूर म्हणाल्या.

मणिपूरमधील घटना लज्जास्पद : मणिपूरमधील घटना लज्जास्पद आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची विचारधारा महिलाविरोधी आहे. त्यामुळे देशाच्या प्रतिमेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या संदर्भात राज्यात सभागृहात बोलण्याची परवानगी नाही. त्यामुळे आता देश आणि महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Manipur Women Parade : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यापूर्वी जमावाने लोकांची घरे जाळली, अनेकांना मारले ठार; एफआयआरमध्ये नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details